Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिसाणी येथे विहिरीत पडून गव्याचा मृत्यू

बामणोली / वार्ताहर : जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठारा नजीक पिसाणी (ता. सातारा) गावचे हद्दीत विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या म

पाटण-ढेबेवाडी मार्गावरील पूल पाण्याखाली तर कराडजवळ महामार्गावर पाणीच पाणी
आष्टी तालुक्यातील केळ सांगवी येथील ड्रॅगन फ्रूट,खजूर,सफरचंद बागेची पाहणी करताना जिल्हाधिकारी
ढगाळ वातावरणामुळे गहु काढणीला वेग

बामणोली / वार्ताहर : जागतिक वारसा स्थळ असणार्‍या कास पुष्प पठारा नजीक पिसाणी (ता. सातारा) गावचे हद्दीत विहिरीत पडून गव्याचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पिसाणी गावातील नामदेव गोगावले यांची पिसाणी गावाजवळच्या शेतात विहीर आहे. आज (शनिवार) सकाळी ते शेताला पाणी देण्यासाठी गिरणोळी शिवारात गेले असता विहिरीत गवा मृत अवस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही माहिती सरपंच लक्ष्मण गोगावले यांना दिली.
काही दिवसांपूर्वी गव्याचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. जंगलामध्ये वन्य प्राण्यांसाठी पानवटे तयार केलेले आहेत. पण ते कमी पडत असल्याने वन्य प्राणी पिण्याचे पाणी व अन्नाच्या शोधात गावाच्या जवळ येत आहेत. त्यांना अंदाज न आल्याने त्यांचा असा अपघाती मृत्यू होत असल्याची माहीती सरपंच गोगावले यांनी दिली.

COMMENTS