Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त

पुणे ः बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला गुन्हे शाखेने वारजे भागात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. सराइताने दोन दि

राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण 1 लाख 40 हजार दावे निकाली
कोणी ही सत्तेचा तांब्रपट घेऊन आलेले नाही .
बिबट्यानंतर आता तरस शिरले घरात; नागरिकांमध्ये घबराट

पुणे ः बेकायदा पिस्तूल बाळगणार्‍या सराइताला गुन्हे शाखेने वारजे भागात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल जप्त करण्यात आले. सराइताने दोन दिवसांपूर्वी बिबवेवाडी भागात एकाला पिस्तुलाचा धाक दाखविल्याचे तपासात उघड झाले आहे. गणेश उदय जाधव (वय 21, रा. वारजे माळवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. वरिष्ठ निरीक्षक रंगराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक ज्ञानेश्‍वर ढवळे, अंमलदार प्रतीक मोरे, शरद वाकसे, विनोद भंडवलकर, सुजित पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली. जाधव सराइत आहे. अल्पवयीन असताना त्याच्याविरुद्ध खून, दहशत माजविणे असे गुन्हे दाखल झाले आहेत.

COMMENTS