Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला 

या हल्ल्यात घाडगे या जखमी झाल्या आहेत

 सातारा प्रतिनिधी -  सातारा जिल्ह्यातील लाेणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात घाडगे या जखमी झाल

धर्मकार्य आणि साहित्यसेवा माणुसकीला बळ देईल ः प्रा. आदिनाथ जोशी
अखेर आरणगाव ग्रामपंचायती विरोधात चौकशी समिती नेमली  
रूढी-परंपरांना फाटा देत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त किर्तन सेवा…

 सातारा प्रतिनिधी –  सातारा जिल्ह्यातील लाेणंद नगरपंचायतीच्या नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्यावर तिघांनी हल्ला केला. या हल्ल्यात घाडगे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. पाेलिस या घटनेचा तपास करीत असल्याची माहिती पाेलिस अधिकारी विशाल वायकर यांनी दिली. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार ही घटना सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. लोणंद- निंबोडी रस्त्यावर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी नगरसेविका तृप्ती घाडगेंवर हल्ला केला. यामध्ये चाकूचा वापर केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.दरम्यान या घटनेत नगरसेविका तृप्ती घाडगे यांच्या गळ्यातील मंगळसुत्र पर्स, मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे लाखाचा ऐवज लंपास झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सध्या तृप्ती घाडगे यांच्यावर एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

COMMENTS