Homeताज्या बातम्यादेश

देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

24 तासात आढळले 3 हजारांहून अधिक रूग्ण

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 3 हजार 16 नवे रुग्ण आढळून आल्यामुळे केंद्र सरका

मोहरमसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी
Nagpur : गणेशपेठ आगारातील कर्मचारी संपात सहभागी… | ST Bus Strike | Maharashtra News (Video)
मते द्या, अन्यथा पैसे खात्यातून काढून घेणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असून, गेल्या 24 तासांमध्ये तब्बल 3 हजार 16 नवे रुग्ण आढळून आल्यामुळे केंद्र सरकारची चिंता वाढली आहे. कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता 13 हजार 509 झाली आहे. एका दिवसात 6 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नव्या आकडेवारीसह देशातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या 4 कोटी 41 लाख 69 हजार 941 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 5 लाख 30 हजार 862 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा रोजच्या संसर्गाचा दर 2.7 टक्के आणि आठवड्याचा संसर्गाचा दर 1.71 टक्के नोंदवण्यात आला आहे. याआधी एका दिवसात 2151 नवीन रुग्ण आढळले होते. राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्यामुळे दिल्ली सरकार सावध झाले आहे.

COMMENTS