देशात कोरोनाचे 4041 नवे रुग्ण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशात कोरोनाचे 4041 नवे रुग्ण

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 जणांचा मृत्यू आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त

विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या बसला अपघात
म्हाडा, आरोग्य व टिईटी प्रकरणाचा ‘ईडी’कडून होणार समांतर तपास
सर्वात श्रीमंत पॉवर कपलच्या यादीत दीपिका-रणवीरचा समावेश | LOKNews24

नवी दिल्ली : गेल्या 24 तासांत 4041 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच गुरुवारी दिवसभरात 10 जणांचा मृत्यू आहे. देशात 11 मार्चनंतर ही सर्वात जास्त कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांवरून चार हजारांवर पोहोचली आहे. आधीच्या दिवशी देशात 3712 नवीन रुग्ण आढळले होते. त्यानंतर आज हा आकडा 4 हजारांवर पोहोचला आहे.
देशात कोरोनाच्या संसर्गात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 20 हजार 177 एवढी झाली आहे. सक्रिय रुग्णांची दर 0.05 टक्के आहे. तर देशातील रुग्ण बरे होण्याचा दर 98.74 टक्के आहे. गुरुवारी दिवसभरात 2 हजार 363 रुग्ण बरे झाले आहेत. तर गेल्या 24 तासांत 10 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 4 लाख 25 हजाप 379 नमुने तपासण्यात आले आहेत. देशव्यापी कोरोना लसीकरणात आतापर्यंत 193 कोटीहून अधिक कोरोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत.

COMMENTS