नागपूर येथिल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या बांधकाच्या प्रक्रियेची लवकरच सुरुवात : अमित देशमुख

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नागपूर येथिल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या बांधकाच्या प्रक्रियेची लवकरच सुरुवात : अमित देशमुख

मुंबई : नागपूर येथिल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या बांधकाम कामाच्या प्रक्रियेची लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांन

एफआरपीप्रश्‍नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलक स्थानबध्द
मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्तात वाढ
 रस्त्यावरचे गॉगल पडणार महागात

मुंबई : नागपूर येथिल कॅन्सर इन्स्टिट्युटच्या बांधकाम कामाच्या प्रक्रियेची लवकरच सुरुवात करणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली. देशमुख म्हणाले, या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर कोरोनाची पहिली आणि नंतर दुसरी लाट आली. शासनाने कोरोना प्रतिबंधासाठी, उपचारांसाठी प्रयत्न सुरु केले. नागपूर येथिल रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून कर्करोग इन्स्टिट्यूट उभारण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नागपूर येथील या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी लागणारी यंत्रसामुग्री, उपकरणे, आस्थापनेवरील मनुष्यबळ या सर्वांसाठी प्रयत्न केले जातील असेही ते म्हणाले. या विषयावर उपस्थित झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री गिरीश व्यास, डॉ.रणजित पाटील, अमरनाथ राजूरकर, नागोराव गाणार, अभिजीत वंजारी आदिंनी सहभाग घेतला.

COMMENTS