राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजधानीत ‘संविधान दिन’ साजरा

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे ‘महा

पोलिस भरती आणि पावसाळा
कोपरगाव शहरात वाढले चोर्‍याचे प्रमाण
रोडचा अंदाज न आल्याने एसटी थेट घुसली कंपनीत | LokNews24

नवी दिल्ली : महाराष्ट्र सदन आणि महाराष्ट्र परिचय केंद्र येथे आज ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या समाजमाध्यमांद्वारे ‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाचे थेट प्रसारणही करण्यात आले. कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनाच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर आयोजित कार्यक्रमात ‘राज्यघटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन करण्यात आले. यावेळी निवासी आयुक्त शामलाल गोयल, गुंतवणूक तथा राजशिष्टाचार आयुक्त डॉ.निधी पांडे,अपर निवासी आयुक्त डॉ. निरुपमा डांगे यांच्यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र परिचय केंद्रात ‘संविधान दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी परिचय केंद्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘राज्य घटनेच्या उद्देशिकेचे’ सामूहिकपणे वाचन केले. यावेळी जनसंपर्क अधिकारी तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांच्यासह महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. संविधानातून न्याय, स्वातंत्र्य ,समता व बंधुता यांची शाश्वती देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकणाऱ्या ‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाचे आज सकाळी 11.00 वाजता महाराष्ट्र परिचय केंद्राच्या तिन्ही भाषेतील अधिकृत ‘ट्विटर हँडल’,‘फेसबुक’, ‘युट्यूब चॅनेल’ आणि ‘कू’ या समाज माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात आले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने १९६८ मध्ये ‘महापुरुष : डॉ आंबेडकर’ या लघुपटाची निर्मिती केली असून श्री. नामदेव व्हटकर यांनी या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे तर ज्येष्ठ संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले आहे.

COMMENTS