Homeमहाराष्ट्रमराठवाडा

शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पिक विमा योजनेसाठी अर्ज करावेत

परभणी :- शेतकऱ्यांची अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत अर्

बैलपोळा फोडण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 : पुणे विभाग-एक दृष्टीक्षेप
Nanded : येथील कर्मचारी करतात जीव मुठीत धरून काम l LokNews24

परभणी :- शेतकऱ्यांची अर्ज भरण्यासाठी बँकामध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यास सुलभता यावी म्हणून प्रधानमंत्री पिक विमा योजनेत अर्ज, विमा हप्ता सामाईक सुविधा केंद्रामार्फत ऑनलाईन पध्दतीने नि:शुल्क भरु शकतील. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पिक विम्याचा अर्ज राष्ट्रीयकृत बँक, व्यापारी बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व सामाईक सुविधा केंद्रातून भरावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपिट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमीमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2020-21 मध्ये राबविण्यात आली असून खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2021-22, खरीप हंगाम व रब्बी हंगाम 2022-23 या दोन वर्षाकरीता रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीकडून राबविण्यात येत आहे.
पिक विमा भरण्यासाठी विहीत नमुन्यातील अर्ज, आधारकार्ड, सातबारा उतारा, अधिसुचित पिकांचे पेरणी केलेले स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्याचा करारनामा किंवा संमतीपत्र आणि बँक पासबुकाची प्रत आदि कागदपत्रे आवश्यक आहेत. कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी व्हायचे किंवा नाही याबाबत निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र हंगामाच्या आधी किंवा योजनेतील सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदार देणे अपेक्षित आहे. योजनेत सहभागी मुदतीच्या 7 दिवस अगोदार शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना पुढील हंगामाकरीता योजनेतील सहभागातील वगळण्यात येईल. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र देणार नाही त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजल्या जाईल. असेही कळविण्यात आले आहे.

COMMENTS