Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री साईबाबांच्या मूर्तीची आज प्राणप्रतिष्ठापना

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता येथील दत्त मंगल कार्यालय मंडळाच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिरात केल्या जाणार्‍या श्री साईबाबांच्य

शिर्डी विमानतळाकडे करापोटी थकलेले 6 कोटी रुपये त्वरित द्या
वन्य प्राण्यांसाठी वनविभागाच्या पाणवठ्यात टाकले पाणी
इंजेक्शनच्या त्या व्हीडिओने उडवली खळबळ ; आनंदऋषीजी हॉस्पिटलने केला खुलासा

शिर्डी/प्रतिनिधी ः राहाता येथील दत्त मंगल कार्यालय मंडळाच्या वतीने शहरात उभारण्यात आलेल्या श्री साईबाबा मंदिरात केल्या जाणार्‍या श्री साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शुक्रवार 3 फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे. ही साई मूर्ती मंगळवार रोजी शिर्डी नगरीतूनविधिवत पूजा करून राहाता येथे आणण्यात आली. राहत्यात ग्रामदैवत वीरभद्र महाराज मंदिराचे पुजारी सर्जेराव भगत यांच्या हस्ते मूर्तीची प्रारंभी पूजा करण्यात आली त्यानंतर विरभद्र मंदिर ते श्री दत्त मंदिरापर्यंत फुलांनी सजवलेल्या रथातून पारंपारिक वाद्य वृंदाच्या गजरात श्री साईच्या  मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली.

या मिरवणुकीत मोठ्या संख्येने साईभक्त व पंचक्रोशीतील ग्रामस्थ सहभागी झाले होते मूर्तीची  विधिवत पूजा  नूतन साईमंदिर स्थळी वेदशास्त्र संपन्न राहाता ग्रामचे ग्रामपुरोहित आध्यात्मिक सल्लागार अनंतगुरू लावर व ब्रह्म वृंदांच्या उपस्थितीत श्‍लोक व मंत्रोचारात संपन्न झाली 3 फेब्रुवारी रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यानिमित्त दि 31 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत दररोज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिर स्थळी करण्यात आले आहे. श्री. दत्त मंगल कार्यालय ट्रस्टचे अध्यक्ष ऍड दीपक गांधी व सर्व विश्‍वस्त यांनी मंदिर निर्माण व मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता विशेष परिश्रम घेत आहेत. या आध्यात्मिक सोहळ्याला राहाता शहरातील व पंचक्रोशीतील साईभक्त ग्रामस्थ दररोज मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून साई मंदिर निर्मितीचा आनंदोत्सव घेत आहेत.

राहाता शहरात साईबाबा आपल्या हयातीत अनेकदा येऊन गेलेत त्यामुळे साईंच्या पदस्पर्शाने राहाता भूमी सुद्धा पवित्र झाली आहे. साईबाबांचे मंदिर राहाता शहरात असावे ही असंख्य साई भक्तांची इच्छा श्री. दत्त मंगल कार्यालय ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाने पूर्ण केले आहे. त्यामुळे  राहाता शहरात साई भक्ती मध्ये रममान होण्याचा व रोज साईं दर्शनाचा लाभ मिळणार आहे.श्री. साईबाबांच्या मूर्तीच्या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने महिलावर्ग व पुरुष सहभागी झाले होते. बाबांच आगमन शहरात होणार असल्याने शहरातील अनेक घरांसमोर सडा व रांगोळी काढण्यात आली होती.साईबाबांची मूर्ती च्या आगमनाचं स्वागत घरोघर करण्यात आलं. साईंच्या मंदिराने आता बाबांचं राहाता शहरात कायमस्वरूपी आगमन झाल्याचे भावना साईभक्त मनोभावे व्यक्त करीत आहे.

COMMENTS