काँगे्रस देणार राजकीय घराणेशाहीला फाटा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँगे्रस देणार राजकीय घराणेशाहीला फाटा

उदयपूर/वृत्तसंस्था : गेल्या तीन दिवसांपासून काँगे्रसचे राजस्थानमधील उदयपूर येथे नव संकल्प शिबिर सुरू असून, या शिबिरात काँगे्रसकडून आगामी 2024 च्या न

डाँ.तनपुरे कारखान्याच्या कामगारांचे अर्धनग्न आंदोलन ; युनियनच्या पदाधिकाऱ्यांचा आंदोलन हाणून पाडण्याचा प्रयत्न; पेरणे
सनी लिओनीचा न्यूड फोटोशूट सोशल मीडियावर| फिल्मी मसाला | LokNews24 |
ए. आर रहमान यांचा कार्यक्रम पुणे पोलिसांनी केला बंद

उदयपूर/वृत्तसंस्था : गेल्या तीन दिवसांपासून काँगे्रसचे राजस्थानमधील उदयपूर येथे नव संकल्प शिबिर सुरू असून, या शिबिरात काँगे्रसकडून आगामी 2024 च्या निवडणुकींना कसे सामौरे जायचे यासंदर्भात रणनीती ठरवण्यात येत असून, यामध्ये राहुल गांधी काश्मीर ते कन्याकुमारी देशव्यापी यात्रा करणार असल्याचे संकेत काँगे्रसकडून देण्यात आले आहेत. काँग्रेस पक्ष पुन्हा उभारीने उभा राहावा म्हणून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी तरुणांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे आता राजकीय घराणेशाहीला फाटा देणारा निर्णय काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी घेतला आहे.
काँग्रेसच्या चिंतन शिबिरात मोठा निर्णय घेण्यात आळा आहे. एका कुटुंबाला एकच तिकीट मिळेल. दुसर्या सदस्याने पक्षाला 5 वर्षे दिली असतील, म्हणजे पक्षासाठी सक्रिय काम केले असेल तरच तिकीट मिळेल, असा निर्णय घेण्यात आला आहे. पण या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात काही फरक पडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण महाराष्ट्रात काँग्रेसचे अनेक राजकीय कुटुंब आहेत. त्यामध्ये दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे कुटुंब. विलासराव यांचे अमित देशमुख आणि धीरज देशमुख दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत. यापैकी अमित हे महाराष्ट्राच्या वैद्यकीय, शिक्षण, सांस्कृतीक कार्य विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. त्यामुळे काँगे्रसच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अनेक राजकीय घराणे काँगे्रसच्या छताखाली एकसंध राहतील का, याचे उत्तर भविष्यातच मिळणार आहे.
2014 नंतर काँग्रेसने आपला जनाधार गमावला असून, लोकांशी संवाद साधण्यासाठी राहूल गांधी या जनयात्रा करणार असल्याचे समोर आले आहे. नवसंकल्प शिबिरामध्ये राहुल गांधी यांच्या पुढच्या वर्षभरात देशभरातल्या अनेक ठिकाणी जनजागरण यात्रा आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. राहुल गांधी यांच्या देशव्यापी जनजागरण यात्रेत बहुतांश ठिकाणी पदयात्रांचा समावेश असेल, असं सूत्रांनी सांगितलं आहे. काँग्रेस पक्ष महागाई,बेरोजगारीच्या मुद्द्यावर देशभरात शंभर ठिकाणी मेळावे आयोजित करणार आसल्याची माहिती आहे. तर, काँग्रेसमधील जी-23 गटाच्या नेत्यांच्या मागणीनुसार काँग्रेसमध्ये भाजपच्या धर्तीवर पार्लमेंटरी बोर्ड ही तयार होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. काँग्रेस पक्षानं राजस्थानच्या उदयपूरमध्ये आयोजित केलेल्या नवसंकल्प शिबिराचा आज अखेरचा दिवस आहे. काँग्रेसचं अध्यक्षपद पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्याकडे देण्यात येणार का हे येणार्‍या दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. दुसरीकडे सोनिया गांधी यांनी नव संकल्प शिबिराच्या पहिल्या दिवशी पक्षासमोरचं संकट असाधारण असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला विशाल सामुदायिक प्रयत्नांनी त्याचा सामना करायचं असल्याचं सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु झाली आहे. या कार्यकारिणीत नेमक्या कोणत्या मुद्यांवर चर्चा झाली हे येणार्‍या काळात समोर येईल. काँग्रेसनं नव संकल्प शिबिरात विविध विषयांवर समित्यांची निर्मिती करुन चर्चा केली होती. महागाईच्या मुद्यावर, शेतकर्‍यांच्या मुद्यावर चर्चा करण्यात आली. न्याय योजनेवर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह इतर नेते उदयपूर नवसंकल्प शिबिरात सहभागी झाले आहेत.

संसदीय मंडळ स्थापन करण्याची मागणी
भाजपच्या धर्तीवर काँगे्रसमध्ये देखील जी-23 नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या संसदीय मंडळाच्या स्थापनेची मागणी केली आहे. या बैठकीत चिंतन शिबिरात आतापर्यंत विविध विषयांवर चर्चा होऊन संघटना मजबूत करण्यासाठी विचारमंथन झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा, संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्यासह अनेक नेते उपस्थित आहेत.

COMMENTS