अकोले : अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या महागाई व टंचाई विरोधात देशभर तीव्र स्वरूपात विविध स्तरावर आंदोलन होत असताना अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अकोले तहसीलदार कार्यालयात अकोले तहसीलदारांना निवेदन देत सरकारच्या बेजबाबदार कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात अचानकपणे वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. आजवर केंद्र सरकारने किमान 50 वेळा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करत युपीए सरकारच्या काळात चारशे रुपये असलेला गॅस सिलेंडर आता साडेनऊशे रुपये पोहोचला आहे. अकोले तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी भल्या पहाटेपासून फार मोठ्या रांगाच रांगा दिसत असून ही परवड कधी थांबेल या प्रतीक्षेत सर्वसामान्य जनता असल्याचे चित्र आहे. अकोले तालुक्यातील गॅस डिस्ट्रीब्यूटर जे असतील या सर्वांची एक बैठक तहसीलदार यांनी बोलावून सिलेंडर वितरणासंबंधी त्यांना काही नियम घालून द्यावेत कि ज्यायोगे नागरिकांना घरगुती वापराचा सिलेंडर मिळू शकेल.त्याचबरोबर व्यावसायिकांनाही एलपीजी सिलेंडर मिळाले पाहिजे याबाबत ही कार्यवाही व्हावी अशी मागणी अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शिष्टमंडळाने माननीय तहसीलदार साहेब,माननीय पीआय साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजी नेहे, ज्ञानेश्वर झडे, विक्रम नवले,अरुण वाकचौरे,साईनाथ नवले,सुजित नवले, शंकर वाळुंज, संपत कानवडे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

अकोले : अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या महागाई व टंचाई विरोधात देशभर तीव्र स्वरूपात विविध स्तरावर आंदोलन होत असताना अकोले तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने अकोले तहसीलदार कार्यालयात अकोले तहसीलदारांना निवेदन देत सरकारच्या बेजबाबदार कार्यपद्धतीचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात अचानकपणे वाढ करून सर्वसामान्य जनतेची लूट सुरू केली आहे. आजवर केंद्र सरकारने किमान 50 वेळा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ करत युपीए सरकारच्या काळात चारशे रुपये असलेला गॅस सिलेंडर आता साडेनऊशे रुपये पोहोचला आहे.
अकोले तालुक्यातील घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी भल्या पहाटेपासून फार मोठ्या रांगाच रांगा दिसत असून ही परवड कधी थांबेल या प्रतीक्षेत सर्वसामान्य जनता असल्याचे चित्र आहे.
अकोले तालुक्यातील गॅस डिस्ट्रीब्यूटर जे असतील या सर्वांची एक बैठक तहसीलदार यांनी बोलावून सिलेंडर वितरणासंबंधी त्यांना काही नियम घालून द्यावेत कि ज्यायोगे नागरिकांना घरगुती वापराचा सिलेंडर मिळू शकेल.त्याचबरोबर व्यावसायिकांनाही एलपीजी सिलेंडर मिळाले पाहिजे याबाबत ही कार्यवाही व्हावी अशी मागणी अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शिष्टमंडळाने माननीय तहसीलदार साहेब,माननीय पीआय साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली. यावेळी तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शिवाजी नेहे, ज्ञानेश्वर झडे, विक्रम नवले,अरुण वाकचौरे,साईनाथ नवले,सुजित नवले, शंकर वाळुंज, संपत कानवडे यांचेसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS