Homeताज्या बातम्यासंपादकीय

काँगे्रस आणि काही प्रश्‍न …

राज्यात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युपीए कुठे आहे, असा सवाल केल्यानंतर काँगे्रसच्या सर्वच नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीके

परिवर्तनाचा ‘नवा थिंक टँक’
हवामान बदलाचे संकट
पायाभूत सुविधांचा अभाव

राज्यात पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी युपीए कुठे आहे, असा सवाल केल्यानंतर काँगे्रसच्या सर्वच नेत्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर टीकेची झोड उठवली. यानिमित्ताने पुन्हा एकदा काँगे्रस जागी झाली हे यानिमित्ताने समोर आली. आजच्या राजकीय परिस्थिती लक्षात घेता, काँगे्रसच्या त्या त्या राज्यातील आणि राष्ट्रीय नेत्यांनी जो आक्रमकपणा घ्यायला हवा होता, तो त्यांनी घेतलेला नाही. परिणामी काँगे्रसचे अस्तित्वावर प्रश्‍न निर्माण व्हायला लागले होते. काँगे्रस खर्‍या अर्थाने गलितगात्र झाली असून, तिला ऊर्जा देणे, एक नवा कार्यक्रम देण्याची गरज आहे. मात्र कोणताही कार्यक्रम न देता केवळ भाजपवर टीकेची झोड उठविल्यामुळे काँगे्रसचे पुन्हा जिंवत झाली असे म्हणता येणार नाही. राहुल गांधी सातत्याने सावरकर, गोडसे यांच्यावर टीका करून, सांस्कृतिक संघर्षांची आणि विचारधारा तीव्रतेने पुढे घेऊन जातांना दिसून येत असले तरी, यावरून देखील म्हणावा तसा प्रभाव पडलेला नाही. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी कुठे आहे, युपीए असा सवाल करून काँगे्रसला डिवचले असले, तरी त्यामुळे काँगे्रस जागी झाली हे नसे थोडकेच म्हणावे लागेल. राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकारण समोरच्याला नेहमीच गोंधळात टाकणारे असते. सर्वसामान्य माणूसच नव्हे, तर राजकीय विचारवंत, तज्ज्ञ देखील त्यांच्या राजकारणाचा तळ शोधू शकत नाही. शरद पवारांच्या कृतीने राजकारणात एखादी वावटळ येते, आणि सर्वजण त्या वावटळीचा विचार करत असतांना, पवार आपले काम करून शांतपणे बाजूला होतात. ही पवारांची खासियत. ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर देखील पवारांनी आपल्याला यातून अलगद बाहेर केले. काँगे्रसला डिवचले नाही, की काँगे्रसची पाठराखण ही केली नाही. राष्ट्रीय राजकारणात पश्‍चिम बंगालच्या निवडणूकीनंतर विरोधक काहीसे आक्रमक होतांना दिसून येत आहे. आणि त्यांचे अस्तित्व देखील दिसून येत आहे. अन्यथा भाजपच्या पाशवी बळापुढे विरोधकांचे अस्तित्व शून्य होते. मात्र पश्‍चिम बंगालमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह या जोडगोळीने आपले सर्वस्व पणाला लावले, सर्वच राज्यातील नेते, ताकद, पैसा सर्वच गोष्टी पश्‍चिम बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी पणाला लावले. मात्र ममता बॅनर्जी यांनी आक्रमक पावित्रा घेत, भाजपला धूळ चाटली. त्यामुळे विरोधकांना देखील आपण मोदी सरकारला शह देऊ शकतो, हा विश्‍वास पश्‍चिम बंगालच्या निवडणूकांवरून आलेला आहे. त्यानंतर राजकारणातील चाणक्य प्रशांत किशोर यांनी चार-पाच वेळी घेतलेल्या शरद पवारांच्या भेटी, त्यानंतर प्रियंका गांधी, राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या घेतलेल्या भेटी यातून प्रशांत किशोर आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकांची रणनीती आखतांना दिसून येत आहे. देशाच्या राजकारणांत आगामी 2024 मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांची रणनीती आखण्यात येत असतांना, या प्रक्रियेमध्ये काँग्रेस अजून कुठे दिसत नाही. राहुल गांधी आणि प्रशांत किशोर यांच्या बैठका झाल्या असल्या, तरी त्यांना काँगे्रसमध्ये प्रवेश देण्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांचा विरोध आहे. याविरोधात काँगे्रसची जी-23 नेत्यांची टीमने एकत्र येत पुन्हा एकदा बैठक घेतली. त्यामुळे काँगे्रसला जुन्या नेत्यांचा आणि नवीन येऊ घातलेल्या नेत्यांचा समन्वय साधण्यासाठी एकत्र येऊन यातून मार्ग काढण्याची गरज आहे. शरद पवार यावर बोलतांना म्हणाले की, काँग्रेसची नेतेमंडळी राहुल गांधी हे विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा चेहरा होऊ शकतात, असे सांगतात.तसेच प्रशांत किशोर काँगे्रसमध्ये प्रवेश करणार असल्यांच्या चर्चांनी वेग धरला होता. मात्र काँगे्रसने प्रशांत किशोर यांच्यासंदर्भात स्पष्ट भूमिका न घेतल्यामुळे किशोर सध्या ममता बॅनर्जी यांना प्रमोट करतांना दिसून येत आहे. ममता बॅनर्जी यांना राष्ट्रीय स्तरावरचे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी प्रादेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी त्या विविध राज्यात भेटी घेतांना दिसून येत आहे.

COMMENTS