Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडीचे पाणी व अवकाळीने नुकसानीच्या मदतीसाठी आज काँगे्रसचे आंदोलन

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; module: photo; hw-remosaic: false; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; scene

पारनेरच्या महिला तहसीलदारांचा आत्महत्येचा इशारा; आमदार निलेश लंकेकडे रोख
बबनराव बाळाजी कुटे यांचे निधन
धनगर समाजाच्या मोर्चाला हिंसक वळण
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; module: photo; hw-remosaic: false; touch: (-1.0, -1.0); modeInfo: ; sceneMode: 8; cct_value: 5882; AI_Scene: (-1, -1); aec_lux: 89.0; aec_lux_index: 0; hist255: 0.0; hist252~255: 0.0; hist0~15: 0.0; albedo: ; confidence: ; motionLevel: 0; weatherinfo: null; temperature: 45;

श्रीगोंदा शहर: उन्हाळी हंगामात प्रकल्पात 92 टक्के पाणी असताना, श्रीगोंदे तालुक्यास शेतीसाठी केवळ सहा दिवस पाणी दिले. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत भरले नाहीत. हा निर्णय कालवा सल्लागार समितीत झाला. त्यावेळी कालवा सल्लागार समितीचे श्रीगोंद्यातील सदस्य एक शब्दही बोलले नाहीत. त्यामुळे श्रीगोंदे तालुक्यावर अन्याय झाल्याचा आरोप काँग्रेस नेते घनश्याम शेलार यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलतांना शेलार म्हणाले की, डिंबे धरणातून डाव्या कालव्याद्वारे येडगाव धरणात 6.25 टीएमसी पाणी मिळाले नाही. 7 एप्रिलला डिंबे धरणात चार टीएमसी पाणी शिल्लक होते. हे पाणी येडगावात सोडावे, यासाठी आम्ही पत्रव्यवहार केला, पण थेंबभर पाणी मिळाले नाही. ते तेथेच मुरले. कुकडीचे आवर्तन हे टेल टू हेड सोडताना सुरुवातीला 110 ते 165 किमी पाणी द्यावे, पाण्याचे स्त्रोत व श्रीगोंदे शहरासाठी लेंडी नाल्यात पाणी सोडणे आवश्यक असून, त्यासाठी आज 27 मे रोजी श्रीगोंद्यात धरणे आंदोलन करणार असल्याचे घनश्याम शेलार यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, अवकाळी पावसाने श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी, काष्टी, कोळगाव, लोणी व्यंकनाथ, घारगाव, पिसोरे खांड येथील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले, पण अद्याप नुकसानीचे पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. शेतकर्‍यांवर संकट, आपत्ती असताना, तालुक्यांचे प्रतिनिधी कुठे आहेत, त्यांचे चिरंजीव दिसत नाहीत, विधानसभा डोळ्यासमोर असताना तेही कुठे दिसत नाहीत, ही दुर्दैवाची बाब असल्याचे शेलार म्हणाले. यावेळी युवक काँगेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, रुपेश काळेवाघ, संजय आनंदकर, बाळासाहेब शेलार उपस्थित होते.

COMMENTS