Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संवादातून वाद सोडवून संघर्ष टाळावा : प्रमुख जिल्हा न्यायाधीश एम. जे. धोटे

सातारा / प्रतिनिधी : नागरिकांनी आपले कौटुंबिक वाद विवाद लोकन्यायालयाच्या माध्यमातून सामंजस्याने सोडवावेत. कोणताही वाद जास्त न ताणता संवादातून वाद

इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील 22 गावातील 141 घरकुल मंजूर; निशिकांत भोसले-पाटील यांच्या पाठपुरव्याला यश
वडार समाजाचा प्रश्‍न सोमवारी विधिमंडळात मांडणार : विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर
घर नाही म्हणणार्‍या जयंत पाटलांच्या नावावर 3 कोटींचा बंगला

सातारा / प्रतिनिधी : नागरिकांनी आपले कौटुंबिक वाद विवाद लोकन्यायालयाच्या माध्यमातून सामंजस्याने सोडवावेत. कोणताही वाद जास्त न ताणता संवादातून वाद सोडवून संघर्ष टाळावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांनी केले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आणि वकील संघ जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. जे. धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी श्रीमती धोटे बोलत होत्या. याप्रंसगी जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी, वकील संघाचे अध्यक्ष सुखदेव पाटील उपस्थित होते.
यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी या लोकअदालतीमध्ये एकूण 12 पॅनेल आहेत. त्यापैकी ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता व ज्यांना न्यायालयात येणे शक्य नाही. अशा पक्षकारांसाठी एक पॅनेल ऑनलाईन आहे. आजच्या लोक अदालतीमध्ये एकूण 9 हजार 117 प्रकरणे ठेवण्यात आली आहेत. त्यापैकी 3 हजार 288 प्रकरणे वादपूर्व आहेत. तसेच ग्रामपंचयातीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे ठेवण्यात आली असल्याचे सांगितले. यावेळी सर्व जिल्हा न्यायाधीश, वकील व पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS