गुजरात प्रतिनिधी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी आज पहाटे वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिव
गुजरात प्रतिनिधी– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी आज पहाटे वयाच्या १०० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर यूएन मेहता रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज त्यांची प्राणज्योत मावळली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. हिराबेन यांचा १८ जून रोजी १०० वा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. मोदी यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करून ते अहमदाबादकडे रवाना झाले आहेत. या महिन्यात ते ४ डिसेंबर रोजी गांधीनगरमध्ये त्यांच्या आईला भेटले होते. यावेळी त्यांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या, यानंतर त्यांनी आईच्या पायाला स्पर्श करत आशीर्वाद घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी हिन्दीमध्ये ट्विट करत लिहिले आहे की, शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम… मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम कर्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है.
मिळालेल्या माहितीनुसार काल मोदी हे त्यांच्या आईच्या भेटीला अहमदाबाद येथे पोहचले होते. दुपारी ३.३० वाजता त्यांनी त्यांच्या आईची भेट घेतली. तब्बल दीड तास मोदी हे त्यांच्या आईसोबत होते. भारतीय जनता पार्टीचे खासदार जुगलजी ठाकूर यांनी हिराबेन यांना दोन दिवसांत सुट्टी होण्याची शक्यता असल्याची माहिती दिली होती. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि आरोग्य मंत्री रुषीकेश पटेल यांच्या सोबत भाजपचे अनेक नेते दवखान्यात आले होते. मोदी यांच्या आई हिराबेन या मोदी यांचे छोटे बंधु पकंज मोदी यांच्या सोबत गांधीनगर येथे रायसन या गावी राहत होत्या.
COMMENTS