नागपूर ः बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांचे कार्य तसेच भक्तीबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्य
नागपूर ः बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी मानवधर्माचे संस्थापक महानत्यागी बाबा जुमदेव यांचे कार्य तसेच भक्तीबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याने संतप्त झालेल्या अनुयायांनी कळमना पोलिस ठाण्यात ठाण मांडीत त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत तक्रार दाखल केली. सध्या धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम मोहाडी नगर येथे सुरू आहे. प्रवचनात महानत्यागी बाबा जुमदेव यांचा उल्लेख करीत धीरेंद्र शास्त्री यांनी जे राम कार्य करीत नाहीत त्यांचे पूर्वज नरकात आहेत. पण तुम्ही व येणारी पिढी नरकात जाईल’ असे अनुद्गार काढले. परमात्मा एक मार्गात आई वडीलांना मानीत नाही तो हनुमान भक्त होऊ शकत नाही’ असे आक्षेपार्ह वक्तव्य केले.
COMMENTS