Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगाव-पाथर्डी मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध : आमदार मोनिकाताई राजळे

शेवगाव तालुका : मी कधीच मताचे राजकारण केले नाही. शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात विकास करण्याचे भाग्य मला लाभले. मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊ

‘आवर्तन’चा शतकपूर्ती संगीत महोत्सव 24 व 25 जून रोजी लातुरात
कार्तिकी यात्रे निमित्त साेमवारपासून पंढरपूरसाठी रेल्वेच्या ३५ फेऱ्या
 वीज पडून श्री क्षेत्र उत्तरेश्वर महादेव मंदिरावरील ५१ फूट धर्मध्वज कोसळला

शेवगाव तालुका : मी कधीच मताचे राजकारण केले नाही. शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात विकास करण्याचे भाग्य मला लाभले. मतदार संघातील शेवटच्या घटकापर्यंत जाऊन काम करण्याची संधी मतदार संघातील मतदारांनी मला दिली. त्या संधीचे सोने करण्याचे काम मी केले. याचा मनस्वी आनंद सामान्य जनतेच्या चेहर्‍यावर जेव्हा दिसतो तेव्हा केलेले कामाची पावती व समाधान मला मिळते.भविष्यातही असाच विकास कामाचा डोंगर उभारून जनतेची सेवा करणार असल्याचे सांगून शेवगाव पाथर्डी मतदार संघात विकास कामात कधीही मतभेद केला नाही आणि करणार नाही. मतदार संघाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव, भायगाव, बक्तरपुर, मजलेशहर, मठाचीवाडी, भाविनिमगाव या गावामध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत भातकुडगाव फाटा ते बक्तरपुर ते मजलेशहर रस्ता काँक्रिटीकरण व भावीनिमगाव ते सुलतानपूर बुद्रुक ते तालुका हद्द रस्ता काँक्रिटीकरण, ग्राम विकास लेखाशीर्ष 2515 अंतर्गत बक्तरपुर मधील देवटाकळी वडुले रोड मतकर वस्ती ते बढे वस्ती, भातकुडगाव अंतर्गत म्हस्कोबा मंदिर ते देवसडे रस्ता भावीनिमगाव अंतर्गत जरे वस्ती ते मुंगसे वस्ती रस्ता खडीकरण व मजबुतीकरण, भावीनिमगाव अंतर्गत सुकळी रस्ता ते थोरात वस्ती रस्ता खडीकरण व मजबुतीकरण, लेखा शीर्ष 2553 मधून सुलतानपूर अंतर्गत रांजणी शिवरस्ता ते लोखंडी वस्ती खडीकरण व मजबुतीकरण अंतर्गत अर्थसंकल्पीय तरतुदी अंतर्गत भायगाव ते मजलेशहर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले तर काही ठिकाणी प्रत्यक्ष कामांनाही सुरुवात करण्यात आली. यावेळी बापूसाहेब भोसले, ताराचंद लोढे, बापूसाहेब पाटेकर, विष्णुपंत अकोलकर, बंडू पठाडे, भीमराज सागडे, उमेश भालसिंग, वाय डि कोल्हे, संदीप खरड, लक्ष्मण काशीद, मुसाभाई शेख, अनिल सुपेकर, अनंत उकिर्डे, शिवाजी खेडकर, महादेव पवार, सुभाष बरबडे, मोहन लोंढे, कल्याण जगदाळे, संतोष आढाव, गणपत आढाव, विठोबा वाघमोडे, सोपानराव वडणे, डॉ. श्याम काळे, रमेश कळमकर, रणजीत वणे,माणिक शेकडे, कानिफ घाडगे, शिवाजी लांडे, विष्णू घाडगे, पांडुरंग लटपटे, गणेश सामृत, भारत खंडागळे, नवनाथ फासाटे, तुकाराम लोंढे, आप्पासाहेब सुकासे, रामकृष्ण मुंगसे, सतीष निकम, सचिन खंडागळे, किशोर फुलारी, विठ्ठल जिरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS