Homeताज्या बातम्यादेश

व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः व्यावसायिक गॅस सिलेंडर मंगळवारी पुन्हा एकदा महागल्याचे दिसून आले.व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर सात रुपयांनी वाढवला आह

राज्यात अवकाळी पावसाची हजेरी
खरगपूर आय‌आयटी कॅलेंडर : तथाकथित गुणवत्तेचे षडयंत्र!
दख्खनची राणी ९२ व्या वर्षात पदार्पण करणार

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः व्यावसायिक गॅस सिलेंडर मंगळवारी पुन्हा एकदा महागल्याचे दिसून आले.व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरचा दर सात रुपयांनी वाढवला आहे. व्यावसायिक सिलिंडरची किरकोळ किंमत 1,773 रुपयांवरून 1,780 इतकी वाढली आहे. दुसरीकडे, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सलग तीन वेळा किमतीत कपात केल्यानंतर व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
एप्रिल, मे आणि जूनमध्ये सिलिंडर दरात कपात झाली होती. मात्र, मार्चमध्ये व्यावसायिक एलपीजीच्या किमतीत मोठी वाढ झाली. सध्या मुंबईत व्यावसायिक गॅसची किंमत 1733.50 रुपये आहे. जून महिन्यात हे दर 1725 रुपये होते.  कोलकात्यामध्ये व्यावसायिक गॅसची किंमत 1895.50 रुपये  आहे. तर चेन्नईमध्ये सिलेंडरची किंमत 1945 रुपये होती. कोलकात्यामध्ये जून महिन्यात 1875.50 रुपये तर चेन्नईमध्ये किंमत 1937 रुपये इतकी होती. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईत घरगुती गॅसची किंमक 1102 रुपये आहे. कोलकात्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 1129 रुपये आहे. इंडियन ऑईल वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, चेन्नईमध्ये एलपीजी गॅसची किंमत 1118.50 रुपये आहे. तर दिल्लीत  घरगुती गॅसची किंमत 1103 रुपये आहे. दरम्यान या वर्षी मार्च महिन्यात घरगुती गॅसच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. सरकारनं 2023 वर्षाच्या सुरुवातीपासूनच व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये बर्‍याचदा बदल केले आहेत.

COMMENTS