Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथे नदी संवाद यात्रेचा प्रारंभ

सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 12 डिसेंबर ते 31 डिसे

एनसीसीमध्ये मुलींनी प्रवेश घेतल्यास करीयर घडविता येते : कु. आयुषी भांड
सोनं महागले; पाच महिन्यातील उच्चांकी पातळीवर
शेअर मार्केटिंग साठी तालुक्यात एजंटाचा सुळसुळाट : वर्षात डबल करून देणारे आज गायब

सातारा / प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत चला जाणुया नदीला अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दि. 12 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नदी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्ह्यातील कृष्णा, वेण्णा, येरळा व माणगंगा या नद्यांचा समावेश आहे. कृष्णा नदी संवाद यात्रा दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा दि. 12 डिसेंबर 2022 रोजी श्री क्षेत्र महाबळेश्‍वर येथून सुरू झाला.
या प्रसंगी सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, नदी संवाद यात्रेचे समन्वयक प्रदिप पाटणकर, उपविभागीय अभियंता तथा समन्वयक अधिकारी निलेश ठोंबरे, श्रीकांत वारुंजीकर, गट विकास अधिकारी अरुण मरबळे, श्री क्षेत्र महाबळेश्‍वर ग्रामपंचायत सरपंच सुनिल बिरमने, समन्वयक रेणु येरळगावकर उपस्थित होते.
पंचगंगा मंदीर व कृष्णामाई मंदीर येथे जलपूजन करुन नदी संवाद यात्रेची सुरुवात झाली. जि. प. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षक, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या समवेत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

COMMENTS