Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपमध्ये या, अन्यथा जेलमध्ये जा असा काळ

उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

मुंबई/प्रतिनिधी ः देशात सध्या भाजपमध्ये या किंवा जेलमध्ये जा असा काळ सुरु आहे. आपल्या ताकदीची परीक्षा पंतप्रधान मोदी नाही शिवराय बघत आहे. दिशा दा

कोरोनामुळे विधवा महिला शेतकऱ्यांना मोफत बियाणे : कृषीमंत्री दादाजी भुसे
सामूहिक बलात्कार करुन महिलेची हत्या
विहिरीचे काम करत असताना परप्रांतीय पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई/प्रतिनिधी ः देशात सध्या भाजपमध्ये या किंवा जेलमध्ये जा असा काळ सुरु आहे. आपल्या ताकदीची परीक्षा पंतप्रधान मोदी नाही शिवराय बघत आहे. दिशा दाखवण्याची वेळ आली आहे. ही लढाई महाराष्ट्रात आपण लढत आहोत. सरकार स्थापन करायचे आपले मविआचे सरकार पुन्हा स्थापन होणारच असा विश्‍वास उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीच्या वेळी बोलून दाखवला.
उद्धव ठाकरे म्हणाले, लोकशाहीच्या चारपैकी तीन स्तंभाची वाट लागली. आता अपेक्षा फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. पत्रकारांच्या हातात कलम असावे पण आजकाल काही पत्रकारांच्या हातात कमळ आहे. न्यायदेवतेच्या पट्टी वेगळी आणि धृतराष्ट्रासमोर झालेले वस्त्रहरण वेगळे. न्यायदेवता लोकशाहीचे वस्त्रहरण होणार नाही. जुन्या पेन्शनसंदर्भात उद्धव ठाकरे म्हणाले की, जुनी पेन्शन योजना लागू करायला हवी, आमचा त्यासाठी पाठिंबा आहे, केंद्राची महाशक्ती पाठीमागे असताना योजनेला काय समस्या आहेत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, पंचामृत योजनेचा अर्थ कुणाला पोटभर मिळणार नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पाबाबत बोलताना म्हटले की, अर्थसंकल्पाला पंचामृत असं गोड नाव देण्यात आले. पंचामृत म्हणजे पूजेनंतर हातावर पळीने टेकवतात ते. त्याच्याने काय पोट भरलं जात नाही. कोणालाही पोटभर देणार नाही, हातात जेवढे पडेल त्यावर पोट भरा आणि डोक्यावर हात फिरवा असा त्याचा अर्थ आहे. असा विचित्र अर्थसंकल्प जाहीर असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

COMMENTS