Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अपप्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी पुढे या ः पांडुरंगगिरी महाराज

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा गावातील भजनी, पुजारी, वारकरी हे एकटे नसून राज्यातील वारकरी त्यांच्या पाठीशी आहेत. आळंदीत आणि पंढरीत गुहा

राज्यमंत्री तनपुरेंसह मनपा आयुक्तांना खंडपीठाची नोटीस ; मनपा अभियंत्याला पाठीशी घालणे भोवणार?, 16 जुलैला सुनावणी
पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू ; अत्याचारानंतर खून केल्याचा संशय
गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश सुविधा केंद्र सुरु

देवळाली प्रवरा ः राहुरी तालुक्यातील गुहा गावातील भजनी, पुजारी, वारकरी हे एकटे नसून राज्यातील वारकरी त्यांच्या पाठीशी आहेत. आळंदीत आणि पंढरीत गुहा गावातील घटनेच्या निषेधार्थ लाखोंचा निषेध मोर्चा काढू, असे प्रतिपादन उद्धव महाराज मंडलिक यांनी राहुरी येथे आयोजित वारकरी व गुहा पंचक्रोशीतील नागरीकांनी काढलेल्या मोर्चाप्रसंगी केले. तर आता खूप झाले, आपल्या धर्मस्थळाकडे वाकडे पाहणार्‍यांना यापुढे जागेवरच उत्तर द्या, आपण आता रडायचे नाही. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे आपण वारस आहोत. यापुढे जर गुहा गावातील पुजारी, वारकरी यांच्याकडे कोणी वाईट नजरेने पाहीले, त्रास देण्याचा प्रयत्न केला तर आख्ख्या राहुरी तालुक्यातील हिंदू लोकांनी एकत्र यावे आणि या अपप्रवृत्तींना ठेचून त्यांचा जागेवर बिमोड करावा, असे खुले आवाहन पांडुरंगगिरी महाराज यांनी यावेळी केले. हिंदूरक्षक संत परिषदेच्यावतीने राहुरीत या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

             राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ दैनंदिन पूजा करणार्‍या पुजार्‍यांवर व भजन करणार्‍या वारकर्‍यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ काल मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी हजारो वारकरी व गुहा व पंचक्रोशीतील कानिफनाथ भक्त या मोर्चात सहभागी झाले होते. टाळ मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथ भक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले त्यानंतर अतिशय शिस्तबद्ध रित्या निघालेला मोर्चा नगर-मनमाड मार्ग, शहरातील मुख्य पेठ मार्गे राहुरी तहसीलवर धडकला. यावेळी रामकृष्ण हरी, कानिफनाथ महाराज की जय आदी जयघोष करण्यात आला. या मोर्चात महंत उद्धव महाराज मंडलीक, पांडुरंग महाराज वावीकर, अर्जुन महाराज तनपुरे, आदिनाथ महाराज दुशिंग, किशोर महाराज जाधव, संजय महाराज शेटे, भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, श्रीकांत महाराज गागरे, नवनाथ महाराज आहेर, सुजित महाराज कदम, प्रमिला महाराज कोळसे
आदींसह राज्यातील संत महंत व टाकळरी, वारकरी व नाथ भक्त सहभागी झाले होते. यावेळी उद्धव महाराज मंडलीक, पांडुरंग महाराज वावीकर, किशोर महाराज जाधव, अजय मांजरे, संपत महाराज जाधव, प्रा.एफ. झेड देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. वारकरी व नाथभक्त यांच्या मोर्चास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांचा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वारकरी, नाथभक्त व गुहा ग्रामस्थ यांनी वारकर्‍यांवर व पूजार्‍यांवर हल्ला करण्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलिस प्रशासनाने स्वीकारले. शेवटी पसायदानाने या मोर्चाची सांगता झाली.

देवदेवतांचे, मंदिरांचे रक्षण करणे आपले कर्तव्य ः ह.भ.प.मंडलिक – वारकरी संप्रदायाने नेहमी सहिष्णुता शिकवलेली आहे. परंतु, आता एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करण्याचे दिवस नसून तेथेच हात धरून समोरच्याला शिक्षा दिली पाहीजे. धर्म, संस्कृतीचे, आपल्या देवदेवतांचे मंदिरांचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य नव्हेतर धर्मपण आहे. त्यामुळे जर आपण त्याचे रक्ष करू शकत नसलो आणि आपला अति मानवतावाद व उदारतावाद या प्रवृत्तींना समजत नसेल तर अशांना त्याच ठिकाणी दंड देणे हेही नितीचेच एक काम असल्याचे उद्धव महाराज मंडलिक यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS