Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उत्तर भारतात थंडीची लाट दिल्लीत 1.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

नागपुरमध्ये थंडीने दोघांचा मृत्यू ; राज्यात दोन दिवसांत थंडी वाढणार

नवी दिल्ली/मुंबई ः उत्तर भारतात तापमानात मोठी घट झाली असून, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यात थंडीची लाट जाणवतू असून, हवामान विभागाने उ

महिला सन्मान योजनेची अंमलबजावणी सुरू
‘बॉईज ३’ ने घेतली कोटींची उड्डाणे
हनीट्रॅप ब्लॅकमेलिंग जाळ्यात अडकला क्लासवन अधिकारी ; नगर तालुका पोलिसात दुसरा गुन्हा दाखल, 3 कोटीची मागणी

नवी दिल्ली/मुंबई ः उत्तर भारतात तापमानात मोठी घट झाली असून, दिल्ली, राजस्थान, हरियाणा, पंजाब या राज्यात थंडीची लाट जाणवतू असून, हवामान विभागाने उत्तर भारता रेड अलर्ट जारी केला आहे. विविध राज्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी दाट धुक्याची चादर पसरली आहे. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत. राज्यात विदर्भासह पश्‍चिम महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरला आहे. तसेच उत्तर भारतातही तापमानाचा पारा घसरला असून, दिल्लीत 1.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

देशभरात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढतांना दिसून येत असून, उत्तरप्रदेशातील कानपूरमध्ये 24 तासांत 25 जणांचा थंडीमुळे बे्रनस्ट्रोक होऊन मृत्यू झाल्याचे समोर आल्यानंतर शनिवारी नागपुरात देखील थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात आगामी दोन दिवसांत थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात थंड वारे वाहू लागल्याने नागपूरमध्ये अचानक पारा घसरला आहे. नागपूरमध्ये अचानक पारा घसरल्याने नागपूरात कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला. नागपूर शहरात गेल्या दोन दिवसांत दोन अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. हे दोन्ही मृत्यू थंडीने झाल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील मोरभवन जवळ 70 वर्षीय वृद्ध मृतावस्थेत आढळले आहेत तर गणेशपेठ पोलीस स्टेशन हद्दीत 35 ते 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही जण कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपले असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर भारतात गेल्या दोन दिवसांपासून सर्व राज्यांत दाट धुके तसेच थंडीची लाट आली आहे. त्यामुळे राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, उत्तराखंड, हरियाणा भागांत तीव्र थंडी आणि दाट धुके पसरले आहे. येत्या 7 ते 9 जानेवारीदरम्यान हिमालयीन भागात पश्‍चिमी चक्रवाताची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे उत्तर भारतातील सर्वच राज्यांत थंडीच्या लाटेबरोबरच दाट धुक्यामध्ये वाढ होणार आहे.  या स्थितीमुळे उत्तर भारतातून राज्याकडे तीव्र थंड वारे वाहणार आहेत. त्यामुळे राज्यात येत्या 24 तासांत थंडीचा कडाका वाढणार आहे. सध्या राज्यात किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार अंशांनी वाढ आहे. मात्र, उत्तर भारताकडून राज्याकडे थंड वारे वाहू लागल्यानंतर अचानक वातावरणात बदल होऊन थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

महाराष्ट्रात येलो तर, उत्तर भारतात रेड अलर्ट जारी –
देशभरात थंडीचा कडाका वाढल्यामुळे महाराष्ट्रात येलो तर उत्तर भारतातील अनेक जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात डार्क यलो अलर्ट जारी आहे. तर युपीची राजधानी लखनौमध्ये अती थंडीच्या परिणामामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिल्लीतही काही भागात किमान तापमान 1.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. अन्य भागांतूनही सरासरी 3 अंश तापमान दिल्लीत आहे. रविवारपर्यंत थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता असून, त्यानंतर पुढील पाच दिवस लोकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

COMMENTS