Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात दुष्काळाचे ढग गडद

पर्जन्यमानातील तुटीमुळे पाणीसंकट

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट कायम आहे. गेल्या 22-25 दिवसांपासून पाऊस न झाल्य

‘ई-ऊसतोड कल्याण’ ॲपचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे लोकार्पण
वाईन निर्णयाविरोधात अहमदनगरनं दाखल केली जनहित याचिका | DAINIK LOKMNTHAN
नगर मधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला अटक

पुणे/प्रतिनिधी ः राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे राज्यावर दुष्काळाचे सावट कायम आहे. गेल्या 22-25 दिवसांपासून पाऊस न झाल्याने पाणीसंकट गडद होतांना दिसून येत आहे. कोकण वगळता सर्वत्र पाणीटंचाईची समस्या उभी राहतांना दिसून येत आहे. तर अनेक ठिकाणी खरीपाची शेती संकटात सापडली आहे. पावसाने ओढ दिल्यामुळे पिकं करपली आहेत.
पुरेशा पावसाअभावी राज्यावर पाणीसंकट निर्माण झाले आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 21 टक्के कमी पाऊस पडला आहे. मराठवाड्यात सरासरीपेक्षा 18 टक्के कमी पाऊस पडला आहे. विदर्भात सरासरीपेक्षा 9 टक्के कमी पावसाची नोंद झाली. तर अहमदनगर जिल्ह्यात 34 टक्के, धुळे जिल्ह्यात 23 टक्के, जळगावात 14 टक्के कमी पाऊस पडला आहे. कोल्हापुरात 14 टक्के, नंदुरबारमध्ये 21 टक्के, नाशिक जिल्ह्यात 9 टक्के, पुण्यात 17 टक्के कमी पाऊस पडला आहे. सांगलीत 45 टक्के, सातार्‍यात 36 टक्के, सोलापुरात 27 टक्के कमी पावसाची नोंद झाली. विशेष म्हणजे मराठवाड्यात भीषण परिस्थिती आहे. मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणी पातळीत मोठी घट झाली. मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 76 तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. पिण्याचे पाणीच कमी असल्यामुळे आता पिकांच्या सिंचनासाठीदेखील पाणी वापरावर बंधने आली आहेत. मराठवाड्याला दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. मराठवाड्यातील अनेक धरणांमधील पाणी पातळी ही कमालीची घटलेली आहे. त्यामुळे सिंचनाच्या पाण्यापासून ते पिण्याच्या पाण्यात मोठी तूट मराठवाड्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणार्‍या हरसूल धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली. हरसूल धरणाची पाणी पातळी गेल्या वर्षाच्या पावसाळ्यात 28 फुटांपर्यंत आली होती. पण यावर्षी सध्याच्या घडीला हरसूल धरणातील पाणी पातळी ही केवळ 5 ते 6 फूटपर्यंत आहे. त्यामुळे आगामी काळात पाऊस पडला नाही तर परिस्थिती अतिशय भीषण होऊ शकते.

मराठवाड्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर – मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट कायम असून, आगामी काही दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास पाणीपातळीत कमालीची घट बघायला मिळू शकते. त्यामुळे मराठवाड्यात 8 जिल्ह्यांमधील 76 तालुक्यांमधे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची शक्यता आहे. कारण धरणांमधील पाणी साठा घटत चालला आहे. विशेष म्हणजे निम्न तेरणा आणि सीना कोळगाव धरणात 0 (शून्य) टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

COMMENTS