Homeताज्या बातम्यादेश

हिमाचल प्रदेशात ढगफुटीने हाहाकार

शिमला ः केरळमध्ये भूस्खलन होवून तब्बल 167 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल चार गावांवर दरडी कोसळल्याच्या घटना घडल्यानंतर आता हिमाचल प्रदेशात देखील

पुणे रेल्वे विभागीय कार्यालयात रेल्वेच्या विस्तारीकरणाबाबत बैठक
सिंघू बॉर्डरवर आणखी एका शेतकर्‍याचा मृत्यू
पुष्पा 2 चं शूटिंग सुरू

शिमला ः केरळमध्ये भूस्खलन होवून तब्बल 167 जणांचा मृत्यू झाला असून, तब्बल चार गावांवर दरडी कोसळल्याच्या घटना घडल्यानंतर आता हिमाचल प्रदेशात देखील पावसाचा हाहाकार दिसून येत आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या ढगफुुटीने शिमला, कुल्लू आणि मंडी जिल्ह्यांतील वरच्या भागात नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. तर शिमला जिल्ह्यातील रामपूर विभागातील झाकरी भागातील समेज खड्डू येथील हायड्रो प्रोजेक्टजवळ मध्यरात्री ढगफुटीमुळे आलेल्या पूरस्थितीमुळे गोंधळ उडाला. यामुळे 50 हून अधिक नागरिक बेपत्ता झाले आहे.
मंडी जिल्ह्यातील चोहर खोर्‍यातील तिक्कन थलटू कोडमध्ये, अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. तर अनेक इमारती पाण्यात वाहून गेल्या. मुसळधार पावसामुळे मलाणा धरण फुटले असून नद्या, नाल्यांपासून दूर राहून सुरक्षित स्थळी जाण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. मंडीचे जिल्हा दंडाधिकारी अपूर्व देवगण हे मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी रवाना झाले आहेत. मात्र, मुसळधार पावसामुळे रस्तेही बंद झाले आहेत. रामपूर, शिमला येथे ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली आहे. बुधवारी रात्री समेळ खड्डू येथे आलेल्या पुरामुळे आजूबाजूच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हाहाकार उडाला. गुरुवारी पहाटे ढगफुटी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर उपायुक्त अनुपम कश्यप आणि पोलिस अधीक्षक संजीव गांधी हेही रवाना झाले आहेत. एसडीआरएफची टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. उपायुक्त अनुपम कश्यप यांनी सांगितले की, ढगफुटीमुळे प्रभावित झालेल्या भागातून 50 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. एसडीएम रामपूर निशांत तोमर देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते हे पाण्याखाली गेले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते तुटून पडले आहेत. यामुळे बचाव कार्य राबावन्यासाठी बचाव उपकरणे हातात घेऊन दोन किलोमीटर पायी जावे लागत आहे.

COMMENTS