Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नियमबाह्य रीतीने चालविण्यात येत असलेले  दारूचे दुकान तात्काळ बंद करा

देगलूर /प्रतिनिधी: देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथील बालाजी गंगाराम रोयलावार रा. देगलूर यांच्या मालकीचे  सिएल -थ्री  देशी दारु दुकान हे धार्मि

लातूर जिल्हा बँक ढोबळ नफ्यामध्ये राज्यात अव्वल
औसा बाजार समितीचे महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर
पंधरावा वित्त आयोगाचे पाच लक्ष व पाणीपुरवठा चे दोन लक्ष रुपये खर्चाच्या अनियमित्ततेची चौकशीची मागणी.

देगलूर /प्रतिनिधी: देगलूर तालुक्यातील मौजे हणेगाव येथील बालाजी गंगाराम रोयलावार रा. देगलूर यांच्या मालकीचे  सिएल -थ्री  देशी दारु दुकान हे धार्मिक स्थळ ,आरोग्य केंद्र व मानवी वस्तीत असून याचा त्रास या धार्मिक स्थळी देवदर्शनासाठी, आरोग्य केंद्र या ठिकाणी नियमबाह्य रीतीने चालविण्यात येते . औषध उपचारासाठी आलेल्या रुग्णांना स्त्रीयांना व पुरुषांना होत असून याची योग्य चौकशी करून या भागातून देशी दारुचे दुकान हटविण्यासाठी दि. 21 मार्च 2023 रोजी राज्य उत्पादन शुल्क विभाग नांदेड यांना देण्यात आले होते, परंतू या विभागाकडून याचे गांभीर्य लक्षात घेताना दिसत नसल्यामुळे अर्जदार प्रेसनजित जयपाल कांबळे सामाजिक कार्यकर्ता दावणगिरकर यांनी दि. 24 एप्रील 2023 रोज सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर येथे अमरण उपोषणास प्रारंभ केले.

यावेळी अमरण उपोषणास सुरुवात करताना अर्जदार प्रेसनजित कांबळे यांनी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी नांदेड, यांच्यासह उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर, राज्य उत्पादन शुल्क देगलूर पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन देगलूर, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे मरखेल या सर्व संबंधित अधिकार्‍यांना लेखी तक्रारी देण्यात

आले होते .परंतू या तक्रारीची कसल्याच प्रकारची दखल घेतली नसल्यामुळे दि. 24 एप्रील 2023 रोजी दुय्यम निरिक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग देगलूर या कार्यालयासमोर अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. या देशी दारू दुकान संदर्भात माहिती घेतली असता राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हे अति प्रेमाखातर कोणतीच कारवाई करत नाहीत हे आता स्पष्ट झाले आहे.

COMMENTS