Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरीमध्ये तुतारी विरूद्ध घडयाळीचा सामना

तनपुरे-कदम हिच अंतिम लढतीची शक्यता ?

देवळाली प्रवरा ः महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकत आसल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.किंबहुना इच्छुक

औरंगपूरला आमदार लहामटेंकडून भजनी साहित्याची भेट
एटीएममध्ये हातचलाखी, अडीच लाख लांबवले
शेतकर्‍यांचे पशुधन चोरणारे 4 तासात जेरबंद

देवळाली प्रवरा ः महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूकीची घोषणा कुठल्याही क्षणी होऊ शकत आसल्याने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.किंबहुना इच्छुक उमेदवारांनी आप आपली एक निवडणूक पूर्व फेरी पूर्ण करून आपण निवडणूक लढणार आहे हे मतदारसंघातील मतदारापर्यंत आपला संदेश पोहचवला आहे. राहुरी विधानसभा मतदार संघ या प्रक्रियेला अपवाद राहिला नाही.या मतदारसंघात ही इच्छुकांची भाऊगर्दी होण्यास सुरवात झाली असतांना राहुरी-पाथर्डी-नगर या मतदारसंघातील अंतिम मुख्य लढत दोन राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गट व अजित पवार गट यांच्या तुतारी व घड्याळ मध्ये होईल अशी चर्चा राजकीय विश्‍लेषक व कार्यकर्त्या मध्ये झडू लागली आहे.
       सुमारे पंधरा वर्षांपूर्वी परिसमन आयोगाच्या निर्णयानुसार राहुरी मतदारसंघातील देवळाली प्रवरा सह बत्तीस गावे श्रीरामपूर मतदारसंघात जोडली गेली.त्या काळी आमदार असणारे चंद्रशेखर कदम यांना पुन्हा निवडणूक लढवायची नाही या भावानेतून तर प्रसाद तनपुरे यांनी बर आहे जातात तर बत्तीस गाव आपल्याला काही फरक पडणार नाही  या भावनेतून मतदार संघाचे होणारे तुकडे ही बाब अजिबात गांभीर्याने घेतली नाही. परिणामी बत्तीस गावे श्रीरामपूर ला जोडून नगर पाथर्डी तालुक्यातील अनेक गावे राहुरीला जोडली गेली.व त्याचे परिणाम आज बत्तीस गावा सह विशेषतः तनपुरे कुटुंबाला भोगावे लागले.राहुरी मतदार संघात शिवाजी राव कर्डीले यांची एंट्री झाली.तनपुरे ना काही काळ सत्तेपासून दूर राहावे लागले. 2019 ला प्रसाद तनपुरे यांचे सुपुत्र प्राजक्त तनपुरे राहुरीचे आमदार झाले.दरम्यानच्या काळात त्यानां मिळालेल्या मंत्री पदाचा त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठा उपयोग करून अनेक प्रलंबीत कामे मार्गी लावले. याच दरम्यान शिवाजीराव कर्डीले यांनी राहुरी शी आपली नाळ कायम ठेवली या ना त्या मार्गाने त्यांनी आपला संपर्क आजतागायत सुरु ठेवला. सध्या 2024 च्या विधानसभा निवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होणार आहे या वेळीच्या लढतीत शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्राजक्त तनपुरे हे उमेदवार असतील हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. मात्र प्रबळ पारंपरिक विरोधक असणार्‍या शिवाजीराव कर्डीले यांचे मार्गात अनेक अडथळे निर्माण होऊ लागले आहेत. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी राहुरीतून विधानसभा लढवणार असल्याची पुंगी सोडून दिली.तर माजी आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव देवळाली प्रवरा चे माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी देखील आपण केवळ इच्छुक नाही तर भाजपाची उमेदवारी मिळवण्यासाठी आपले पिताश्री जनसंघ ते भाजपा चे तीन पिढ्याचे एकनिष्ठ स्वयंसेवक चंद्रशेखर कदम याना देखील उमेदवारी मिळवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्याकडे साकडे घालण्यास भाग पाडले आहे. राहुरी मतदार संघात सध्या आमदार असलेले प्राजक्त तनपुरे हे पूर्वी च्या एकत्रित राष्ट्रवादीचे विजयी उमेदवार असल्याने राहुरी मतदारसंघ हा सध्या महायुतीत चा घटक असणार्‍या अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या वाट्याला येणार अशी खात्री वजा दावा अजित पवार गटाच्या नगर जिल्ह्यातील नेत्यांनी केलेल्या असल्याने  ही जागा जर अजित पवार गटाला मिळाली तर सत्यजित कदम यांनी कुटुंबाची एकनिष्ठता पणाला लावून राष्ट्रवादी  मध्ये प्रवेश करण्याची मानसिक तयारी केली आहे. शिवाजीराव कर्डीले हे कसलेले व मातब्बर नेते आहेत काय काय हालचली होत आहेत?काय काय शक्यता आहेत? हे गृहीत धरून त्यांनी काही दिवसापूर्वी अजित पवार यांची भेट घेतली आहे. जर राहुरी नाही तर अन्य कोणत्या मतदारसंघात लाढयाचे याची पूर्ण फिल्डींग कर्डीले यांनी लावून ठेवली आहे. राहुरीचे विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हे जेष्ठ नेते जयंत पाटील यांचे भाचे आहेत. अजित पवार हे देवळालीच्या कदम कुटुंबियांचे भाचे आहेत.चंद्रशेखर कदम मामेभाऊ तर सत्यजीत त्यांचे सुपुत्र. सत्यजित कदम यांना उमेदवारी देऊन प्राजक्त तनपुरे यांचा पराभव करण्यात यश आले तर या पर्यायाने जयंत पाटील यांची शक्ती कमी करण्यास मदत होईल.आणि याच कारणामुळे राहुरी मतदारसंघ हा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवार आपल्या गटाकडे घेण्याची मोठी शक्यता राजकीय विश्‍लेषक वर्तवित आहेत. जर असे घडले तर  येणार्‍या विधानसभा निवडणूकीत राहुरी मध्ये तुतारी विरुद्ध घड्याळ ची लढत झाली तर ती तनपुरे-कदम अशीच होईल हे नक्की! अर्थात अजून बर्‍याच घडामोडी होणार असल्याने येणारा काळच सर्व गोष्टीचे उत्तरे देणार आहे हे निश्‍चित.

COMMENTS