Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपाच्या वतीने पंचवटी मध्ये स्वच्छता अभियान

नाशिक प्रतिनिधी - स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नाशिक मनपाच्या वतीने संपूर्ण शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन, परीसर स्वच्छता तस

एमपीएससी परीक्षेत महिलांमध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सोनाली मात्रे हिचे जन्मभूमीत जंगी स्वागत
हृदयद्रावक ! अख्खं कुटुंब जिवंत जळाले l LOK News 24
डॉ. प्रतिभा जाधव यांच्या कथासंग्रहास पद्मगंगा फौंडेशनचा पुरस्कार प्रदान 

नाशिक प्रतिनिधी – स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नाशिक मनपाच्या वतीने संपूर्ण शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन, परीसर स्वच्छता तसेच मलेरिया, डेंग्यू, चिकुन गुनिया आजार प्रतिबंधक उपाय या मोहिमेचा भाग म्हणून पंचवटी विभागांमध्ये स्वच्छता व आरोग्य कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे अभियान प्रारंभ केले.उपस्थित सर्व कर्मचारी , अधिकारी यांचं स्वागत करण्यात आले.नागरिकांच्या वतीने भाजप पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, शांती सेना कामगार संघटनेचे विश्वास जाधव आदींसह सहकारी यांनी याप्रसंगी स्वागत केले.यावेळी पंचवटी विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय दराडे, स्वच्छता निरीक्षक सर्वश्री उदय वसावे, दुर्गादास माळेकर, दीपक चव्हाण, राकेश साबळे, जीवन कदम, कांता चव्हाण, सुनील दिवे, संतोष कोल्हे,सोनवणे, अनिल दिवे, संतोष बैरागी, दिनेश प्रभावळकर, रवी गवळी, राऊत, जितेंद्र परमार आदींसह सर्व कर्मचाऱ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संतोष रखमे, सचिन बेलदार, विठ्ठल नारोळे, चिंतामण उगलमुगले तसेच ज्येष्ठ नागरिक एकनाथ दिघे ,भास्कर गवळी, लक्ष्मण काकड आदिमसह नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

COMMENTS