Preview attachment IMG-20250223-WA0221.jpg जामखेड : नदी व नदीच्या परिसरात स्वच्छता असावी नदीचे महत्त्व आपल्या लोकांत अजूनही रूजले नसून देशभरात
Preview attachment IMG-20250223-WA0221.jpg
जामखेड : नदी व नदीच्या परिसरात स्वच्छता असावी नदीचे महत्त्व आपल्या लोकांत अजूनही रूजले नसून देशभरात संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली,हे कौतुकास्पद आहे. नदीचे पात्र स्वच्छ झाले तर सुंदर पाणी जलसुंदर होईल, मन सुंदर होईल.स्वच्छते बद्दल जनजागृती होणे आवश्यक असे प्रतिपादन प्रा. मधुकर राळेभात यांनी केले.स्वच्छ जल-स्वच्छ मन या अभियानांतर्गत दि.२३ फेब्रुवारी २०२५ रोजी संत निरंकारी मिशन रजिस्टर दिल्ली, शाखा जामखेड च्या वतीने सकाळी जामखेड शहरातील विंचरणा नदी काठी व तपनेश्वर महादेव मंदिर येथील परिसराची स्वच्छता करण्यात आली. सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशनच्या वतीने संपूर्ण भारत वर्षामध्ये १६०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळेस स्वच्छता करण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, मोहन पवार,प्रदीप टापरे, दिगंबर चव्हाण, राजेंद्र गोरे यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून संत निरंकारी मिशनच्या माध्यमातून शहरात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाचे कौतुक केले. गेल्या १४ वर्षांपासून जामखे शहरात संत निरंकारी मिशनचे काम सत्संग च्या माध्यमातून चालू असून या सामाजिक उपक्रमांमध्ये गेल्या ८ वर्षापासून अनेक ठिकाणांची स्वच्छता वर्षातून दोनवेळा जामखेड शाखेमार्फत करण्यात येत असते तसेच वृक्षारोपण सुद्धा करण्यात येते. सद्गुरु बाबा हरदेव सिंह जी महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे प्रेरणेने २०२३ मध्ये “अमृतजल प्रोजेक्ट’ ची काम हाती घेण्यात आले आणि भारत सरकार च्या संयुक्त विद्मानाने हा उपक्रम राबवला जातो. या उपक्रमासाठी जामखेड शाखेचे मुखी अमित गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली ही सेवा करण्यात आली.या सेवेसाठी निरंकारी मिशनचे स्वयंसेवक अर्थात सेवा दल पुरूष, माहिला,बाळ गोपाळ तसेच ग्रामस्थ व तालुक्यातील सत्संगचे महात्मे यांचे योगदान लाभले. या स्वच्छतेच्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, मोहन पवार, डॉ.शहाणे, दिगंबर चव्हाण, अमित जाधव, प्रदीप टापरे , राजेंद्र गोरे, युवा उद्योजक अनुराग गुगळे ,मच्छिंद्र पोकळे, व संत निरंकारी मिशनचे महात्मे राजाराम कांबळे,भरत देडे, वैभव राळेभात, भूषण राळेभात, गणेश पोकळे, दत्ता जाधव,अखिलेश डाडर ,अनिल अनभुले, शरद अनभुले, नागेश तेलंगे, आयुष गंभीर, तनिष गंभीर, दत्तात्रय कोल्हे, बापू खैरे तसेच रश्मी गंभीर ,वंदना राळेभात, लीना गंभीर, रेखा गंभीर, अलका सूर्यवंशी, पूजा राऊत ,वैशाली राळेभात, ममता हुलगे, प्रिया जमदाडे, अर्चना ठेंगील, वच्छलाबाईं देडे, शिवानी राळेभात आदी म्हात्मे उपस्थित होते.
COMMENTS