Homeताज्या बातम्यादेश

जम्मूतील डोडात पुन्हा चकमक

दोन जवान जखमी दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मूतील काही जिल्ह्यात दहशतवादी हल्ले वाढले असून, दोडा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत 5 जवानांना व

माणूसकी ओशाळली
लोणंदच्या कु. पायल जाधव हिला कराड येथे तायक्वांदो स्पर्धेत सुवर्णपदक
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही

श्रीनगर ः गेल्या काही दिवसांपासून जम्मूतील काही जिल्ह्यात दहशतवादी हल्ले वाढले असून, दोडा जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झाल्यानंतर कास्तीगढ भागातील जद्दन बाटा गावात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 2 सुरक्षा जवान जखमी झाले आहेत.  तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथील केरन भागात झालेल्या चकमकीत लष्कराने 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती, त्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान, दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक सुरू झाली, जी अजूनही सुरू आहे.
दुसरीकडे दोडामध्येही दोन ठिकाणी चकमक सुरू आहे. गुरुवारी पहाटे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात दोन जवान जखमी झाले. लष्कराच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, दहशतवाद्यांनी बुधवारी रात्री उशिरा कास्तीगड भागातील जद्दन बाटा गावात शाळेत उभारलेल्या तात्पुरत्या सुरक्षा छावणीवर गोळीबार केला. यामध्ये दोन जवान जखमी झाले. लष्कराने गोळीबार केल्यावर दहशतवादी जंगलाच्या दिशेने धावले, तेथे लष्कराने त्यांना घेरले. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अधूनमधून गोळीबार सुरू आहे. त्याचवेळी जिल्ह्यात आणखी एका ठिकाणी चकमक सुरू आहे. दहशतवाद्यांनी शोध मोहिमेसाठी एका सरकारी शाळेत स्थापन केलेल्या तात्पुरत्या सुरक्षा छावणीला लक्ष्य केले. या हल्ल्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी झालेल्या चकमकीत 2 जवान जखमी झाले. दरम्यान, जखमी जवानांवर दोडा येथील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आणि त्यांना पुढील उपचारासाठी हेलिकॉप्टरद्वारे लष्कराच्या रुग्णालयात नेण्यात आले. दहशतवादी हल्ल्याला सुरक्षा जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. येथे एक तासाहून अधिक काळ चकमक सुरु होती. याआधी सोमवार आणि मंगळवारच्या दरम्यानच्या रात्री देसा आणि जवळच्या जंगल भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देसा वन क्षेत्रात झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात लष्करातील कॅप्टनसह चार जवान तसेच एक पोलिस कर्मचारी, अशा पाचजणांना वीरमरण प्राप्त झाले होते.

COMMENTS