बीड प्रतिनिधी - बसमध्ये अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. सहसा बसमध्ये प्रवासादरम्यान गर्दी असते त्यामुळे लोकांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणांव
बीड प्रतिनिधी – बसमध्ये अनेक प्रवासी दररोज प्रवास करतात. सहसा बसमध्ये प्रवासादरम्यान गर्दी असते त्यामुळे लोकांमध्ये जागेवरुन किंवा इतर कारणांवरुन भांडण होतं. अशा अनेक घटना समोर येत असतात. अशातच अशीच एक घटना बीडमधून समोर आली आहे जिथे कंडक्टर आणि प्रवासी महिलांमध्ये हाणामारी झाल्याचं पहायला मिळालं. हाणामारी झाल्याची ही घटना बीडमधून समोर आली आहे. बस का थांबवली नाही असं कारण काढून महिला कंडक्टरला शिवीगाळ करून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या धारूर आगारात उघडकीस आला आहे. मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या प्रकरणात मारहाण करणाऱ्या महिलांविरोधात धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबाजोगावरून बस (एमएच 20, बीएल 125) धारूर आगारात आली असता महिला प्रवाशाने कंडक्टरला ‘अंबाजोगाईत बस का थांबवली नाही’ यावरून शिवीगाळ करत मारहाण केली. या प्रकरणी कंडक्टर संगीता दिनकर कांबळे यांच्या तक्रारीवरून आरोपी वैशाली अशोक चिरके रा. जहागीरमोहा, ता. धारूर यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, बसमध्ये असे अनेक प्रकार समोर येतात. कधी प्रवाशांमध्ये हाणामारी होत असते तर कधी कंडक्टरसोबत बाचाबाची होते. यापू्र्वीही अशा घटना समोर आल्या आहेत.
COMMENTS