Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लाच प्रकरणी सिडकोचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मुंबई : लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सिडकोचा एक अधिकारी अडकला. या कारवाईने सिडकोत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिडकोत प्रशा

मनपाच्या आरोग्य सेवा गरजूंन पर्यंत पोहोचविणार
प्रा.अश्विनी जाधव  यांना पीएच.डी. प्रदान
डॉ. आंबेडकर जयंती मिरवणुकीतील दगडफेक पूर्वनियोजित ?

मुंबई : लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सिडकोचा एक अधिकारी अडकला. या कारवाईने सिडकोत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, सिडकोत प्रशासन विभागात महाव्यवस्थापक पदावर कार्यरत असणार्‍या जगदीश राठोड या अधिकार्‍याने इस्टेट एजंट कडून सदनिकेचे फर्स्ट पार्टी डिड ऑफ अपार्टमेंट कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबतची तक्रार एसीबीला प्राप्त झाली. एसीबीने बेलापूर येथील सिडको भवन कार्यालयात सापळा रचला. या सापळ्यात राठोड अलगद सापडला. त्याला लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहाथ पकडले.

COMMENTS