Oplus_131072 लोणी ः महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागांतर्गत, अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती राहाता- शिक्षण विभाग आयोजित मुख्य
लोणी ः महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागांतर्गत, अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पंचायत समिती राहाता- शिक्षण विभाग आयोजित मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा सन 2023-24 मध्ये लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवारानगर येथील प्रवरा पब्लिक स्कूलने इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा या गटातून राहाता तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. अशी माहिती शाळेचे प्राचार्य डॉ. बी बी अंबाडे यांनी दिली.
लोणी येथे आयोजित केलेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे गट शिक्षणाधिकारी राजेश पावसे यांच्या शुभहस्ते प्रशस्तीपत्रक आणि तीन लाख रुपयांचा धनादेश प्रवरा पब्लिक स्कूलच्या प्राचार्यांना प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत मूल्यमापनात पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी व शैक्षणिक संपादणूक या तीनही प्रकारात प्रवरा पब्लिक स्कूलने सर्वात जास्त गुण मिळवून आपले वेगळेपण सिद्ध केले. प्रवरा पब्लिक स्कूलने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानात राहाता तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील,माजी खा.डॉ.सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुष्मिता विखे पाटील,सह सचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालिका लीलावती सरोदे, प्रा. नंदकुमार दळे यांनी अभिनंदन केले. शाळेचे प्राचार्य डॉ. बी.बी अंबाडे, उपप्राचार्य के टी अडसूळ, पर्यवेक्षिका एम एस जगधने, सौ शुभांगी रत्नपारखी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यासाठी विशेष परिश्रम घेतले.
COMMENTS