नवी दिल्ली : छत्तीसगड राज्यात नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँगे्रसचा पराभव विजय मिळवला होता, मात्र अनेक दिवस उलटूनही भ
नवी दिल्ली : छत्तीसगड राज्यात नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने सत्ताधारी काँगे्रसचा पराभव विजय मिळवला होता, मात्र अनेक दिवस उलटूनही भाजपने मुख्यमंत्रीपदी कुणाची नियुक्त करणार याची घोषणा केलेली नव्हती. मात्र भाजपने रविवारी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदी आदिवासी नेते विष्णू देव साय यांच्या नावाची घोषणा केली आहे.
90 सदस्यीय विधानसभेच्या सभागृहात, भाजपने राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जिंकलेल्या 35 जागांच्या तुलनेत 54 जागा जिंकून आरामात विजय दरम्यान, छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्र्यांवरील सस्पेन्स संपला आहे. भाजप विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत छत्तीसगडची कमान विष्णू देव साय यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. विष्णू देव साय यांचे छत्तीसगडचे मुख्यमंत्री म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे. साय हे आदिवासी नेते आणि राज्यातील भाजपचे महत्त्वाचे नाव आहे. आदिवासी समाजातील विष्णू देव साय यांनी 1980 मध्ये प्रवेश केला. विष्णू देव हे छत्तीसगडच्या कुंकुरी विधानसभेतील आहेत. राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. आदिवासी चेहर्यावर भाजप बाजी मारेल अशी अटकळ होती, ती खरी ठरली. विष्णू देव साई 2020 मध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. ते खासदार आणि केंद्रीय मंत्री राहिले आहेत. याशिवाय ते आरएसएस आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंह जवळचे आहेत.
COMMENTS