Homeताज्या बातम्याक्रीडा

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू तुषार देशपांडेचा झाला साखरपुडा

ऋतुराज गायकवाडनंतर चेन्नई सुपरकिंग्सचा आणखी एक क्रिकेटपटू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळा तुषार देशपांडेने मुंबईत साखरपुडा उरकला. त्याने इ

तानाजी विरकर ठरला नागोबा केसरीचा मानकरी; दिल्लीच्या बंटी कुमारला दाखवले आस्मान; शौकिनांची तोबा गर्दी
जसप्रीत बुमराहचे जंगी पुनरागमन; थेट झाला कर्णधार
आशिया कप २०२३ साठी टीम इंडियाची घोषणा

ऋतुराज गायकवाडनंतर चेन्नई सुपरकिंग्सचा आणखी एक क्रिकेटपटू लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. मराठमोळा तुषार देशपांडेने मुंबईत साखरपुडा उरकला. त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्या साखरपुड्याला शिवम दुबेने हजेरी लावली होती. तुषारने साखरपुड्याची बातमी शेअर केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने सोमवारी नभा गड्डमवारबरोबर एंगेजमेंट केली. इंडियन प्रीमियर लीग २०२३ चे चॅम्पियन बनल्यानंतर अवघ्या काही दिवसांनी महाराष्ट्रातील २८ वर्षीय क्रिकेटपटूने आपल्या आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू केली आहे. “शाळेतील क्रश ते आता FIANCÉ म्हणून तिचं प्रमोशन झालंय,” असं कॅप्शन तुषारने फोटो शेअर करताना दिलं. साखरपुड्याच्या फोटोंमध्ये तुषार व नभा खूप सुंदर दिसत आहेत. तुषारने शेरवानी घातली आहे, तर नभा साऊथ इंडियन लूकमध्ये पाहायला मिळाली. दोघांच्या फोटोंवर चाहत्यांबरोबरच त्याचे खेळाडू मित्रही कमेंट्स करून शुभेच्छा देत आहेत. ऋतुराजने ‘अभिनंदन भाऊ, क्लबमध्ये स्वागत आहे,’ अशी कमेंट केली आहे

COMMENTS