Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्राथमिक शाळांच्या वेळेत होणार बदल

शालेयमंत्री दीपक केसरकरांनी मागविला अहवाल .

नागपूर - बदललेली जीवनशैलीमुळे लहान मुले उशीरा झोपतात आणि सकाळी शाळेत जायच्या वेळेला त्यांची झोप झालेली नसते, त्यामुळे शाळांच्या वेळा बदलण्याची गर

शिंपी समाजाने केला भाजपचा जाहीर निषेध
राज्यासह देशात उष्णतेची लाट तीव्र
मिल्लीयाची शेख अस्मत जहांँ हिचे यशवंत महाविद्यालय नांदेड येथील गणित परिसंवाद स्पर्धेत यश

नागपूर – बदललेली जीवनशैलीमुळे लहान मुले उशीरा झोपतात आणि सकाळी शाळेत जायच्या वेळेला त्यांची झोप झालेली नसते, त्यामुळे शाळांच्या वेळा बदलण्याची गरज असल्याचे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केल्यानंतर शाळा बदलांच्या चर्चांनी जोर धरला होता. अखेर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी देखील त्याला अनुकूलता दर्शवत, यासंदर्भातील अहवाल मागवला आहे.
प्राथमिक शाळा या सकाळी भरतात, मुलांची शाळा सकाळी असल्याने त्यांना झोपूतून उठवून शाळेची तयारी करून त्यांना शाळेत पाठवणे हे पालकांसाठी दिव्य काम असते. सकाळी शाळा असल्यामुळे मुलांची झोप पूर्ण न होऊन त्यांच्या प्रकृतीवर देखील परिणाम होत असल्याच्या तक्रारी होत्या. सध्या हिवाळा सुरू असून भर थंडीत मुलांना शाळेत जावे लागत असल्याने मुळे गारठत असल्याने यासंदर्भात राज्यपाल रमेश बैस यांनी या शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. याची दखल घेत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याची घोषणा विधानसभेत केली असून आता नव्या वेळेत वर्ग भरणार असल्याने पालकांना आणि विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यात प्राथमिक शाळा या सकाळी तर माध्यमिक शाळा या दुपारी भरतात. माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे वय 12 वर्षांच्या पुढे तर प्राथमिक शाळांमधील मुलांचे वय 3 ते 10 वर्ष असल्याने प्राथमिक शाळा या दुपारी भराव्या अशी मागणी शिक्षणतज्ज्ञांकडून गेला काही दिवसांपासूंन होत होत होती. राज्यपाल रमेश बैस यांनी देखील सकाळी होणार्‍या प्राथमिक शाळांची वेळ बदलण्यात यावी अशी सूचना केली होती. त्यामुळे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शाळांच्या वेळा बदलण्याबाबत विधान सभेत घोषणा केली आहे. पहाटे शाळा असल्याने छोट्या मुलांच्या झोप पूर्ण होत नसून त्यांच्या जीवन शैलीवर याकहा परिमाण होत असल्याने लहान मुलांच्या शाळांची वेळ बदलण्यात यावी अशी सूचना राज्यापाल रमेश बैस यांनी केली होती. त्यामुळे आता नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या शाळा या आता सकाळी 9 नंतर भरणार आहे, अशी घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत केली.

तज्ज्ञांची समिती स्थापन- शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर या संदर्भात माहिती देतांना म्हणाले की, राज्यपालांच्या शाळा सकाळी घेण्याऐवजी त्यांच्या वेळा बदलण्यात याव्या या मताशी सरकार सहमत आहे. हा निर्णय एकट्याने न घेता या साठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. मनोवैज्ञानिक, बालरोग तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असे केसरकर म्हणाले.

COMMENTS