श्रीहरीकोटा प्रतिनिधी - भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष आता इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने
श्रीहरीकोटा प्रतिनिधी – भारतासह संपूर्ण जगाचं लक्ष आता इस्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेकडे लागलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने 14 जुलै रोजी सोडलेल्या ‘चांद्रयान-3’ने आतापर्यंत चंद्राच्या दिशेने दोन तृतीयांश अंतर पार केलं आहे. त्यानुसार, आज 5 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7 वाजता हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे अशी माहिती इस्रोने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. प्रक्षेपण झाल्यापासून, चांद्रयान-3 ची कक्षा वाढवण्याच्या ऑपरेशनमध्ये पाच वेळा यशस्वीरित्या पार पाडण्यात आले आहे. आज हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. तर, 23 ऑगस्ट रोजी हे चांद्रयान चंद्रावर उतरणार आहे. चांद्रयान -3 ने पृथ्वीच्या कक्षेतील सर्व फेऱ्या यशस्वीरित्या पूर्ण करत 1 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु केला. इस्रोच्या म्हणण्यानुसार, 5 ऑगस्ट रोजी आणखी एका महत्त्वाच्या प्रयत्नात हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. हे यान आज संध्याकाळी 7 वाजता चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या सर्वात जवळ असेल तेव्हा हा प्रयत्न केला जाईल, असं इस्रोने म्हटलं आहे. 5 ऑगस्ट 2023 रोजी संध्याकाळी 7 वाजता लुनार ऑर्बिट इंजेक्शन निर्धारित केले आहे.” यापूर्वी, अंतराळ संस्थेने म्हटले होते की, ते 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 चे ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल. 14 जुलै 2023 रोजी दुपारी 2.35 वाजता अंतराळयान LVM-3 वर यशस्वीरित्या प्रक्षेपित झाले. चांद्रयान-3 ला प्रक्षेपण झाल्यापासून चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यासाठी सुमारे 33 दिवस लागतील असे इस्रोकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज हे यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणार आहे.
COMMENTS