Chandgad : शिक्षकच देशाचे भवितव्य घडवितात. -आ.जयंत आसगावकर (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Chandgad : शिक्षकच देशाचे भवितव्य घडवितात. -आ.जयंत आसगावकर (Video)

'ग्रामीण भागात खरी बुध्दिमत्ता लपली आहे. या बुद्धिमतेला जगासमोर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असतात.शिक्षकच देशाचे भवितव्य घडवित असतो असे प्

कोल्हापूर : शेतकऱ्यांना एकरी 50 हजारांची आर्थिक मदत करावी | LOK News24
छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या पोस्टर समोर दारू पिऊन पोरींचा धिंगाणा.
किरीट सोमय्यांना शहरात कायमची प्रवेशबंदी… नगरपालिकेने केला ठराव

‘ग्रामीण भागात खरी बुध्दिमत्ता लपली आहे. या बुद्धिमतेला जगासमोर आणण्याचं काम खऱ्या अर्थाने शिक्षकच करत असतात.शिक्षकच देशाचे भवितव्य घडवित असतो असे प्रतिपादन पूणे विभाग शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले.चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूल व न.भू. पाटील ज्युनि. कॉलेज येथील अटल टिंकरींग लॅब उद्घाटन व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात. जयंत आसगावकर बोलत होते. यावेळी आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१ अंतर्गत पूणे शिक्षक मतदारसंघाचे शिक्षक आमदार. जयंत आसगावकर यांच्या मार्फत तालुक्यातील पहिल्या टप्यात अकरा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार, एल.डी. कांबळे ,गोपाळ बोकडे , जे.बी. पाटील , यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक ,चंदगड विद्यासंकुलातील सर्व सेवक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS