पुणे/प्रतिनिधी ः युरोप, अमेरिकेसह इतर देशात नकारात्मक आणि आर्थिक चिंतेचे वातावरण असले तरी, भारतावर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे वक्तव्य काह
पुणे/प्रतिनिधी ः युरोप, अमेरिकेसह इतर देशात नकारात्मक आणि आर्थिक चिंतेचे वातावरण असले तरी, भारतावर याचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचे वक्तव्य काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केले होते. मात्र याउलट वक्तव्य केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले असून, येत्या जूननंतर भारतात आर्थिक मंदी येऊ शकते, असे म्हटले आहे. जी 20 परिषदेतील उद्घाटनपर भाषणानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
’जागतिक आर्थिक मंदी सुरू झाली आहे आणि जगातील अनेक देशांमध्ये त्याचा परिणाम जाणवत आहे हे वास्तव आहे. केंद्र सरकारच्या विविध बैठकांतील चर्चांमधून मला मिळालेली ही माहिती आहे. भारतात आर्थिक मंदी जून नंतर धडकू शकते. मात्र, या मंदीची झळ भारतीय जनतेला कमीत कमी बसेल यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, असेही राणे म्हणाले.
यावेळी राणे म्हणाले की, भारतात आर्थिक मंदी आली तर जून नंतर येईल. त्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. उद्योग वाढवले तर रोजगार वाढेल. रोजगार वाढला तर जीडीपी वाढेल. आपल्याला प्रॉफिट कमवणार्या टेक्नॉलॉजी हव्यात, असे राणे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल मला अभिमान आहे. सगळे विषय कॅबिनेटमध्ये येतात, आपल्या नेत्यांच्या बुद्धिमत्ता कमी लेखणे चुकीचे आहे. सरकार बदललं म्हणून निर्णय बदलतात असं नाही. एखादा निर्णय पोषक नसेल तर तो बदलला जातो, सरकार बदललं की दृष्टिकोन बदलतो. सरकार बदलले म्हणून उद्योग बाहेर गेले असे होत नाही. आपल्याकडे गुंतवणूक व्हावी म्हणून उद्योग आणले जातात. मी 4 वर्ष उद्योगमंत्री होतो, जे राज्य जास्त सवलत देईल जागेवर, टॅक्सवर तिथे उद्योग येतात. काही लोक जागा कमी देतात, महाराष्ट्रात जमीन महाग, पायाभूत सुविधा यावर जमिनीचे दर जास्त आहेत. महाराष्ट्र विकसित राज्य असल्याने येथील खर्च जास्त आहेत. काही उद्योग तेवढ्यापुरते जातात आणि महाराष्ट्रात परत येतात, असे राणे म्हणाले. पुण्यातील पायाभूत सुविधा पुढील काळात कशा असतील, यासंदर्भात केंद्र सरकारला पत्र दिलं आहे. जीडीपी वाढण्यासाठी महाराष्ट्र विकसित करण्यासाठी केंद्र प्रयत्न करत आहे. पुण्याला औद्योगिक केंद्र समजतो. आदर्श पायाभूत सुविधा चांगली झाली तर पुणेकरांना पण फायदा होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
COMMENTS