गुंतवणूकदारांना सव्वा तीन लाख कोटींचा फटका

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंतवणूकदारांना सव्वा तीन लाख कोटींचा फटका

रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ आणि कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये आज शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली.

बोठेच्या नगर मुक्कामाचा उलगडा अजून गुलदस्त्यातच ; दोषारोपपत्राचे काम अंतिम टप्प्यात
जुनी पेन्शन योजना लागू करा – मा. आ. डॉ. सुधीर तांबे
अभिषेक दुधाळचे अबॅकस परिक्षेत यश

मुंबई/प्रतिनिधीः रुपयाच्या तुलनेत डॉलरची वाढ आणि कोरोनाच्या वाढत्या घटनांमध्ये आज शेअर बाजारामध्ये मोठी घसरण दिसून आली. शेअर बाजाराच्या या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 3.25 लाख कोटींपेक्षा जास्त पैसे बुडाले. आज सेन्सेक्स 871 अंकांनी घसरून 49 हजार 180 च्या पातळीवर बंद झाला. 

निफ्टी 265 अंकांनी कोसळून 14 हजार 549 वर बंद झाला. सेन्सेक्सच्या टॉप 30 मध्ये केवळ 2 शेअर्स तेजीसह बंद झाले, तर 28 शेअर्स आज लाल चिन्हात बंद झाले. एशियन पेंट्स आणि पॉवरग्रीडच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक आणि आयटीसी यांना सर्वाधिक तोटा झाला. बाजारातील घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य 202.51 लाख कोटींवर आले. 23 मार्च रोजी ते 205.76 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.25 लाख कोटी रुपयांची घसरण झाली. जर्मनी, फ्रान्स, इटली आणि ब्राझीलसारख्या देशांमध्ये कोरोनाचा तिसरा प्रकार समोर आला. त्यातही कोरोनाची वाढती प्रकरणे आहेत. त्याचा परिणाम युरोपच्या बाजारपेठांमध्ये दिसून येतो. युरोपीयन बाजारामध्येही दबाव दिसून येत आहे. भारतात पुन्हा कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. दररोज जवळपास 50 हजार नवीन प्रकरणे समोर येत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्‍वास कमी झाला आहे. आज रुपया खाली आला आणि तो 12 पैशांनी घसरून 72.55 रुपये प्रति डॉलरच्या पातळीवर बंद झाला. डॉलर निर्देशांक आज 92.50 च्या पातळीवर भक्कम व्यापार करीत होता.

COMMENTS