Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुलगुरु सुभाष चौधरी पुन्हा चौकशीच्या फेर्‍यात

राज्यपालांनी दिले नव्याने चौकशीचे आदेश

मुंबई ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यामागे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्हे

भारतीय संघासाठी खूशखबर; टी २० वर्ल्डकपमध्ये थेट ‘एन्ट्री’
आजी-आजोबा मुलांच्या आयुष्यातील संस्काराचे ज्ञानपीठ ः उंडे
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेपचा फ्रेंच सिनेमा पुन्हा झळकणार

मुंबई ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यामागे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याची चिन्हे नाहीत. कारण त्यांच्याविरोधात पुन्हा चौकशीचे आदेश कुलपती आणि राज्यपाल रमेश बैस दिले आहेत. त्यामुळे चौधरी यांच्या अडचणीत वाढ होतांना दिसून येत आहे.
 मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून दिलासा मिळाल्यानंतर दुसर्‍यांदा आपल्या कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आता पुन्हा डॉ. चौधरींवर संकटाचे ढग गडद असल्याचे बोलले जात आहे. विद्यापीठातील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर अनेक आरोप करत त्यांची तक्रार राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे  करण्यात आली होती. परिणामी, या तक्रारींची दखल घेत राज्यपालांनी डॉ. चौधरी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र, त्यानंतर डॉ. चौधरी यांनी या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. तेव्हा न्यायालयाने राज्यपालांचा निर्णय रद्द केला आणि आणि डॉ. चौधरी यांना आपल्या कुलगुरू पदी कायम राहण्याचे आदेश दिले. त्यानुसार डॉ. चौधरी यांनी दुसर्‍यांदा आपल्या कुलगुरू पदाचा  पदभार स्वीकारला होता. असे असले तरी राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांच्या कार्यालयाकडे विविध सिनेट आणि व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केलेल्या आरोपांबाबत डॉ. चौधरी यांच्याविरुद्ध नव्याने चौकशी करण्याचा निर्णय घेतलाय. तसेच राज्यपालांनी उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे यांची चौकशी करण्यासाठी नियुक्ती केली असल्याची माहितीही पुढे आली आहे. त्यामुळे  कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नसल्याचे प्रकर्षाने दिसून आले आहे. नागपूर विद्यापीठातील कथित गैरव्यवहार प्रकरणी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्यावर अनेक आरोप करत शहरातील अनेक लोकप्रतिनिधींसह विद्यापीठातील विविध सदस्यांनी शासन आणि राज्यपालांकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर या प्रकरणातील तक्रारींच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या उच्च तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव अजित बाविस्कर यांच्या समितीने आपला अहवाल राज्यपालांना दिला होता. या अहवालात कुलगुरूंकडून अधिकारांचा दुरुपयोग झाल्याचे, शासनाचे ‘एमकेसीएल’ संदर्भात आदेश असताना त्याची अवहेलना करण्यात आल्याचे ताशेरे ओढण्यात आले होते. परिणामी, या तक्रारींचे गांभीर्य लक्षात घेता कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची पदावरून हकालपट्टी करण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले होते.

COMMENTS