Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

छ. संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. या बैठ

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळूच शकत नाही
हिंगोलीत मराठा समाजाच्यावतीने आमरण उपोषण
सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण द्या

छत्रपती संभाजीनगर- छत्रपती संभाजीनगरमध्ये आज मराठा बांधवांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोठा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत महिला कार्यकर्त्या देखील उपस्थिती होत्या. बैठक सुरु असतानाच कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काही जण दुसऱ्या उमेदवाराकडून पैसे घेऊन आल्याचा आरोप करत या बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहरातील मराठा मंगल कार्यालयात मराठा समाजाच्या बांधवांकडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले. काही कार्यकर्त्यांनी काही लोक येथे उमेदवारांकडून पैसे घेऊन आले आहेत, असा आरोप करत समाज बांधवांची एकमेकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. त्यानंतर या बैठकीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या गोंधळामुळे ही बैठक स्थगिक करण्यात आली. या हाणामारीनंतर घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळी शांतता प्रस्थापित केली.

COMMENTS