Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; इंजिनमध्ये बिघाड

मुंबई ः गणपती दोन दिवसांवर आला आहे. त्याआधी रविवार आल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग सुरु आहे. नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून रेल्वेने रविव

अद्वैतानंद शास्त्रीजी महाराज यांचे निधन
अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाचा विजय
भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट

मुंबई ः गणपती दोन दिवसांवर आला आहे. त्याआधी रविवार आल्याने नागरिकांची खरेदीसाठी मोठी लगबग सुरु आहे. नागरिकांना अडथळा होऊ नये म्हणून रेल्वेने रविवारचा मेगाब्लॉकही रद्द केला. मात्र तरीही नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे. अंबरनाथ आणि बदलापूर दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे कर्जतहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कल्याण लोको शेडमधून इंजिन मागविण्यात आले आहे. पुढील अर्ध्या तासात वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता आहे.

COMMENTS