Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर

सोलापूरची एच. एस. भावना 55 व्या रँकने उत्तीर्ण

सोलापूर प्रतिनिधी - केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ९३३ विद्यार्थ्यांनी यामध्ये यश संपादन केले आहे. सोलापूर मध्य रेल्वे विभागात

शिक्षक, शिक्षकेतरांचे प्रश्‍न सुटण्यासाठी गुरुवारी बैठकीचे आयोजन
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
प्रा. कुंदा दाभोळकर स्मृति केंद्रातर्फे लक्ष्मीबाई पाटील वस्तीगृहाला सहयोग निधी आज प्रदान कार्यक्रम

सोलापूर प्रतिनिधी – केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. ९३३ विद्यार्थ्यांनी यामध्ये यश संपादन केले आहे. सोलापूर मध्य रेल्वे विभागात असिस्टंट ऑपरेशन मॅनेजर म्हणू कार्यरत असलेल्या एच. एस. भावना  यांनी देशात ५५ व्या रँकने उत्तीर्ण होत मोठे यश संपादन केले आहेत. या यशाचं श्रेय आई व मित्र मंडळींना दिला आहे. एच. एस. भावना  यांनी माहिती देताना सांगितले, हा त्यांचा सहावा प्रयत्न होता. पहिल्या दोन प्रयत्नात त्यांना कोणतीही पोस्ट मिळाली नव्हती. २०१५ आणि २०१६ साली भावना यांनी भूगोल विषयासह पूर्व परीक्षा दिल्या होत्या. २०१८ मध्ये पूर्व मुख्य मुलाखत परीक्षेत यश मिळाल्यावर एच. एस. भावना यांची इंडियन रेल्वे ट्राफिक सर्व्हिस या विभागात निवड झाली होती. मिळालेल्या पोस्टवर रुजू होत भावना यांनी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना २०२२ साली झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत भावना यांनी देशात ५५ वी रँक प्राप्त केली आहे.

COMMENTS