केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केंद्र सरकार महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाही

कर्नाटकाने महाराष्ट्राच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचे प्रयत्न सुरू केले कर्नाटकाचा भाग असल्याचा दावा त्यांनी केल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली

मुंबई प्रतिनिधी  - सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय समिती स्थापन केलेली असतानाच कर्नाटकाने महाराष्ट्राच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्य

एक अजित पवार ७२ तासांत सटकले.. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार?
संजय राऊत यांची पत्रकार परिषद सुरु असताना निघाला भला मोठा साप
संजय राऊतांना जामीन मिळताच सुषमा अंधारे झाल्या भावुक अन् डोळ्यात पाणी

मुंबई प्रतिनिधी  – सीमावाद सोडवण्यासाठी राज्य सरकारने सर्वपक्षीय समिती स्थापन केलेली असतानाच कर्नाटकाने महाराष्ट्राच्या प्रयत्नांवर पाणी फेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी थेट सांगली जिल्ह्यातील जतवर दावा सांगितला आहे. जत हा कर्नाटकाचा भाग असल्याचा दावा त्यांनी केल्याने राज्यभरातून संतापाची लाट उसळली आहे. कर्नाटकात भाजप सरकार असूनही भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीकडून खोड्या काढल्या जात असल्याने राज्यातील विरोधी पक्षांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. 

हे सरकार लवकरात लवकर घालवलं नाही तर महाराष्ट्राचे पाच तुकडे केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे राज्याराज्याचे हस्तक राहणार नाहीत, असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटावर अत्यंत कडक भाषेत टीका केली आहे.

COMMENTS