नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते रविवारी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यावे
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते रविवारी 28 मे रोजी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन होणार आहे. यावेळी 75 रुपयांचे नाणे आणि स्टॅम्पचे लोकार्पण करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी नाण्याविषयी नोटिफिकेशन जारी केले आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन इमारतीचे उद्घाटन दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. उद्घाटन कार्यक्रमापूर्वीचे विधी सकाळी सुरू होतील. पूजा आणि इतर धार्मिक विधींनंतर सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास सकाळचा टप्पा संपेल, त्यानंतर दुसर्या टप्प्याची सुरुवात दुपारी लोकसभेच्या सभागृहात राष्ट्रगीत गायनाने होईल. यादरम्यान 75 रुपयांचे नाणे आणि स्टॅम्पही जारी करण्यात येणार आहे.केंद्र सरकार नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी 75 रुपयांचे नाणे बाजारात आणणार आहे. अर्थ मंत्रालयानुसार, हे नाणे गोल असेल, ज्याचा व्यास 44 मिमी ठेवण्यात आला आहे. त्याच्या बाजूला 200 सेर्रेशन्स असतील. हे नाणे 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंकच्या मिक्सरपासून बनवण्यात आले आहे. नाण्याच्या एका बाजूला अशोकस्तंभ असेल, ज्याच्या खाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल. डावीकडे देवनागरीत भारत आणि उजवीकडे इंग्रजीत इंडिया असे लिहिलेले असेल. नव्या नाण्यावर रुपयाचे चिन्ह असेल आणि सिंहाच्या खाली 75 रुपये लिहिलेले असतील. नाण्याच्या दुस-या बाजूला संसद परिसराचे चित्र असेल. छायाचित्राच्या वर देवनागरीत ’संसद संकुल’ आणि खाली इंग्रजीत ’पार्लियामेंट कॉम्प्लेक्स’ असे लिहिलेले असेल.
COMMENTS