कोपरगाव तालुका ः येथील ग्रामस्थ पुरोहित व वेदशास्त्रसंपन्न गुरुजी सुरेश रंगनाथ जोशी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवारी ब्राह्मण सभा मंगल कार्य
कोपरगाव तालुका ः येथील ग्रामस्थ पुरोहित व वेदशास्त्रसंपन्न गुरुजी सुरेश रंगनाथ जोशी यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा शनिवारी ब्राह्मण सभा मंगल कार्यालय (लक्ष्मीनगर) येथे असंख्य ब्रम्हवृंदांच्या उपस्थीतीत शास्त्रोक्त पद्धतीने साजरा झाला, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई होते. प्रत्येकाच्या आयुष्यात सोळा संस्काराला विशेष महत्व आहे. आधुनिक युगात ईश्वरीय शक्ती ज्याच्या त्याच्या इच्छा, भक्तीनुसार फळ देत असते.
ज्या मनुष्याच्या जीवनीत एक हजार पौर्णिमेचे दर्शन पूर्ण होते तेंव्हा हा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा केला जातो. ग्रामस्थ्य पुरोहित सुरेश रंगनाथ जोशी यांनी स्व. त्रंबकमामा जोशी यांच्याकडून याज्ञीकीचे पूर्ण शिक्षण आत्मसात करत ग्रामस्थ पुरोहित म्हणून काम केले, असंख्य तरुण ब्रह्मवृंदांना शिकवणही दिली, सामुदायिक व्रतबंध सोहळ्यातून त्यांनी संस्कारची शिकवण दिली., प्रतिकूल परिस्थितीवर मात करत कुटुंबाला घडवले., (81) एक्याऐंशी वर्ष आरोग्यदायी जीवन लाभल्याचे समाधान अशा संस्कार सोहळ्याने साजरे करण्याचा प्रघात आहे., ठोंबरे गुरुजी यांनी धार्मिक विधी पूर्ण केला. प्राचीन काळी पन्नासाव्यात (वैष्णव) पंच्चान्नव्यात (वारुणी) साठाव्यात (उग्ररथ), पासष्टीत (मृत्युजय महारथी), सत्तराव्यात (भौमरधी), पंच्च्यात्तराव्यात (ऐन्द्री), ऐशीव्यात (सहस्त्रचंद्रदर्शन), पंच्याऐंशीव्यात (रोद्री), नव्वदीत (कालस्वरुप), पंच्याण्णव्यात (त्र्यंबक मृत्युंजय) आणि शंभरीत (त्र्यंबक महामृत्युंजय) असे विविध शांती, सोहळे सांगितलेले आहे, अध्यक्ष पदावरून बोलताना संजय सातभाई म्हणाले की, ग्राम पुरोहित सुरेश जोशी यांचे ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठीचे कार्य सर्वांच्या स्मरणात राहील. सत्कारास उत्तर देताना सुरेश जोशी म्हणाले की, आपल्या आयुष्यात प्रथमच हा सोहळा मुलगी मोनिका उर्फ प्रगती हिने पुढाकार घेऊन साजरा करून कायमस्वरूपी आठवणींची भेट दिली आहे, प्रत्येकाला आयुष्य लाभते त्यात संसाराबरोबरच ईश्वरीय आध्यात्मिक गोष्टींना विशेष महत्त्व देऊन त्यानुरूप मार्गक्रमण करावे. उपस्थीतांना एक्क्याऐंशी किल्लो गुळाचे यावेळी वाटप करण्यांत आले. सुरेश व सौ. शोभा जोशी यांचा मान्यवरांनी सपत्नीक सत्कार केला. कन्या सौ. प्रगती अभिजीत जोशी हिने बाप नावाची कविता सादर करून उपस्थीतांच्या डोळ्यात पाणी आणले. सुत्रसंचलन सौ. वंदना चिकटे यांनी केले तर आभार अभिजीत नंदकुमार जोशी यांनी मानले.,चिरंजीव सार्थक वीरेंद्र जोशी व सर्वेश मयुर जोशी यांनी सुरेश जोशी यांच्या विषयी मनोगत सादर केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या संजय सातभाई, बांधकाम व्यावसायिक प्रसाद नाईक, मकरंद कोर्हाळकर, दिगंबर देशमुख, कोपरगांव ब्राम्हण सभेचे सर्व पदाधिकारी, मित्र परिवार, आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थीत होते
COMMENTS