Homeताज्या बातम्यादेश

मणिपूर हिंसाचाराची सीबीआय चौकशी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घोषणा

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यात गेल्या काही दिवसांपासून उसळलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे नाहीत. हिंसाचाराविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी कें

कर्जतचे भूमिपुत्र हवालदार हिंमत जाधव यांचे अकाली निधन
आदिवासी महिलेवर पोलिसांनीच केला बलात्कार
पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग, 20-25 किमीपर्यंत बसले धक्के

इम्फाळ/वृत्तसंस्था ः मणिपूर राज्यात गेल्या काही दिवसांपासून उसळलेला हिंसाचार थांबण्याची चिन्हे नाहीत. हिंसाचाराविरोधात कठोर पावले उचलण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मणिपूरमध्ये ठाण मांडून असून, त्यांनी हिंसाचार करणार्‍यांना सोडणार नाही, असा थेट इशारा दिला असून, या हिंसाचाराची सीबीआय चौकशी करणार असल्याची घोषणा गुरूवारी पत्रकार परिषदेत केली.
 मणिपूरच्या जनतेचे खोट्या अफवा पसरवणार्‍याकडे लक्ष देवू नये, असे त्यांनी सांगितले. तसेच सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (एसओओ) कराराचे उल्लंघन करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल. यासोबतच महत्त्वाचा निर्णय म्हणून ते म्हणाले की, मणिपूरचे राज्यपाल अनुसुईया उईके नागरी समाजाच्या सदस्यांसह शांतता समितीचे प्रमुख असतील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जातीय हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील जनतेसाठी मदतीच्या उपाययोजनांची घोषणा केली आणि असे न केल्यास कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देताना शस्त्रे बाळगणार्‍यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले पाहिजे, असे आवाहनही शहा यांनी यावेळी केले. केंद्र सरकारने उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या घटनांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली आहे. मणिपूरचे राज्यपाल नागरी समाजाच्या सदस्यांसह शांतता समितीचे अध्यक्ष असतील, असेही त्यांनी सांगितले.  कोणताही पक्षपात आणि भेदभाव न करता तपास केला जाईल आणि दोषींना शिक्षा होईल, असे आश्‍वासन केंद्रीय मंत्र्यांनी मणिपूरच्या जनतेला दिले. मणिपूरमध्ये हिंसक घटनांचा तपास करण्यासाठी अनेक एजन्सी काम करत आहेत. षड्यंत्राचा इशारा देणार्या हिंसाचाराच्या सहा घटनांची उच्चस्तरीय सीबीआय चौकशी. आम्ही तपास निष्पक्ष असल्याची खात्री करू.त्याचबरोबर हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून 5 लाख रुपये आणि मणिपूर सरकारकडून 5 लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल, असे अमित शाह म्हणाले. ही रक्कम डीबीटीद्वारे पीडितांना हस्तांतरित केली जाईल. विशेष वैद्यकीय अधिकारी हिंसाचारग्रस्त भागात वैद्यकीय सुविधा सुनिश्‍चित करतील, असे ते म्हणाले. गृह मंत्रालय आणि इतर मंत्रालयांचे सहसचिव आणि सहसंचालक स्तरावरील अधिकारी लोकांना मदत करण्यासाठी आणि राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरमध्ये उपस्थित राहतील.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठका – गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, त्यांनी तीन दिवसांत इम्फाळ, मोरे आणि चुराचंदपूरसह राज्याच्या विविध भागांना भेटी दिल्या आणि मैतई आणि कुकी समुदायांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. गेल्या एका महिन्यात, मणिपूरमध्ये काही हिंसक घटनांची नोंद झाली आहे. मी गेल्या तीन दिवसांत मणिपूरमध्ये इंफाळ, मोरे आणि चुराचंदपूरसह अनेक ठिकाणी भेटी दिल्या आहेत आणि राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिकार्‍यांसोबत बैठका घेतल्या आहेत. मैतई आणि कुकी समुदायांच्या नेत्यांना भेटलो, असेही त्यांनी सांगितले.

COMMENTS