महिलांच्या गळयातील दागिने चोरणारे दोघेजण पकडले ; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांच्या गळयातील दागिने चोरणारे दोघेजण पकडले ; साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात व उपनगरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून चोरून नेणारे दोघेजण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोल

निसर्ग व पर्यावरण मंडळाचे कार्य आदर्शवत : डॉ.दुधाट
बीजमाता राहीबाई पोपेरे यांची अनोखी दिवाळी; बियाणेरुपी दिवा आणि आरास करून साजरी
सादिकच्या मृत्यूचे गूढ आज उकलणार; पोलिस अधीक्षकांकडे आला अहवाल, तपास सीआयडीकडे वर्ग

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर शहरात व उपनगरात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून चोरून नेणारे दोघेजण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडले. या आरोपींना श्रीरामपूर येथे सापळा रुचून शिताफीने अटक केली व त्यांच्याकडील चोरीचा साडेतीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई श्रीरामपूर शहरातील वॉर्ड क्रमांक एक येथे केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस महिलांचे दागिने ओरबाडणार्‍या गुन्हेगारांचा शोध घेत असताना पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, सफीर खान व त्याचा एक साथीदार हे चेन स्नॅचिंग करुन चोरलेले सोन्याचे दागिने श्रीरामपूर येथे सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे. ही माहिती मिळाल्याने कटके यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर येथे जाऊन सापळा लावला. श्रीरामपुरातील उपाध्ये मळा, खवडी, वॉर्ड क्र.1 येथे सफीर अख्तर हुसेन खान (वय 20, रा. मुंद्रा टोलनाका, शेंडीवाले बाबा, मुंब्रा, जिल्हा ठाणे) व कैलास कमलबहादुर नेपाली (वय 25, रा. नेरळ ममदापुर, ता. कर्जत, जिल्हा रायगड) यांना ताब्यात घेतले व त्यांची अंगझडती घेतली असता सफीर खानकडे असलेल्या कापडी पिशवीत सोन्याचे दागिने सापडले. त्याने व त्याच्या इतर दोन साथीदारांनी नगर शहरातून महिलांच्या गळयातील हे सोन्याचे दागिने ओढून चोरुन आणले असून हे दागिने मोडीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने नगर शहरातील गुन्हे अभिलेख तपासले असता या आरोपींनी दिलेल्या माहितीवरुन तोफखाना पोलिस ठाणे येथे चेन स्नॅचिंगच एकुण चार गुन्हे दाखल आहेत व हे सर्व गुन्हे हा आरोपी व त्याच्या साथीदारांनी केले असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या गुन्हयांतील चोरीस गेलेल्या मुद्देमालातील 3 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 70 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडून जप्त करून त्यांना ताब्यात घेतले व मुद्देमालासह तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, पोलिस हवालदार विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, संदीप पवार, पोलिस नाईक शंकर चौधरी, संदीप चव्हाण, रवि सोनटक्के, सचिन आडवल, संदीप दरदंले, दीपक शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र घुंगासे, जालिंदर माने, महिला पोलिस नाईक भाग्यश्री भिटे, महिला पोलिस कॉन्स्टेबल ज्योती शिंदे, चालक पोलिस हवालदार संभाजी कोतकर व अर्जुन बडे यांनी केली.

COMMENTS