Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिसांना एका वर्षात 20 दिवसांची नैमित्तिक रजा

मुंबई ः राज्यातील पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या 12 दिवसांच्

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार
सहकार बळकटीकरणासाठी पंतप्रधान मोदींचे प्रयत्न-बिपीनदादा कोल्हे
खासदार श्रीनिवास पाटील यांची सातारा लोकसभेतून माघार

मुंबई ः राज्यातील पोलिस दलातील पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक या पदावरील अधिकारी, कर्मचारी यांना सध्या एका कॅलेंडर वर्षात देय असलेल्या 12 दिवसांच्या नैमित्तिक रजांऐवजी जास्तीत जास्त 20 (वीस) दिवस नैमित्तिक रजा विशेष बाब म्हणून अनुज्ञेय करण्यात आले आहे. याबाबत  3 आँक्टोबर 2022 ला शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
सन 2022 -2023 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवरील विधानसभेत उत्तर देतांना उपमुख्यमंत्रीफडणवीस यांनी सांगितले. गृह ,कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय, सार्वजनिक बांधकाम, उद्दोग,उर्जा व कामगार विभागाच्या सन 2022 -2023 या वर्षाच्या पुरवणी मागण्यांवर विधानसभेत चर्चा झाली. त्यावर सभागृहातील सदस्यांनी आप आपल्या मतदारसंघातील समस्यां मांडून विविध सूचना केल्या. विधानसभेतील सदस्यांच्या सूचनांचा सकारात्मक विचार करण्यात येवून त्याविषयी सदस्यांनाकळविण्यात येणार असल्याचे यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सांस्कृतिक कार्य सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत,कृषी मंत्री अब्दुल सत्तार या मंत्री महोदयांनी विधानसभेत सांगितले.

COMMENTS