बीड प्रतिनिधी - मद्यपान करुन कार चालवणार्या लातूर येथील वकीलावर बीडच्या वाहतूक शाखेच्या पोलिसाने गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे.प्रमोद नव

बीड प्रतिनिधी – मद्यपान करुन कार चालवणार्या लातूर येथील वकीलावर बीडच्या वाहतूक शाखेच्या पोलिसाने गुन्हा दाखल केल्याची घटना घडली आहे.
प्रमोद नवनाथ आडसुळे (वय 30, रा. गरड गार्डन शेजारी, बार्शी रोड, लातूर) असे वकीलाचे नाव असून वाहतूक शाखेचे हवालदार नारायण दराडे यांनी गुन्हा दाखल केला आहे. हा वकील लातूरचा रहिवासी असून त्याच्यावर बीड शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात गुरूवारी कारवाई झाली. प्रमोद व त्याचे वडील नवनाथ आडसुळे हे पैठणवरून लातूरकडे कारमधून (एम.एच.14 ए.एफ. 5457) जात होते. जालना रोडवरील आण्णाभाऊ साठे चौकात ड्युटी करत असताना वाहतूक शाखेचे हवालदार नारायण दराडे यांना ही कार वाकडी तिकडी चालवत असल्याचे दिसले. त्यांनी कार बाजूला घेत तपासणी केली असता, सीट बेल्ट लावलेला नव्हता. तसेच, ब्रेथ अॅनालायझरने तपासणी केली असता, त्याने मद्यपान केल्याचे उघड झाले. त्यामुळे त्याच्याविरोधात नारायण दराडे यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
COMMENTS